पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५३. २९१ स्याचा अत लागत नाही. " असे मटलेच आहे.) त्या चिदाकाशात, महावनातील फलाप्रमाणे, एकमेकास न दिसणारी असख्य ब्रह्माडे होती. त्यातील पुढच्या एका आवरणयुक्त ब्रह्माडामध्ये बोरात जशी कीड शिरते त्याप्रमाणे ती शिरली व त्यातील ब्रह्मादिकाच्या लाकाचे उल्लघन करून तारामार्गाच्या व मेघमार्गाच्या खाली असलेल्या भूमडलावर उतरली आणि त्यातील त्या अत.पुर मडपात शिरून पुष्पाच्या राशीत ठेवलेल्या पद्माच्या शवाजवळ जाऊन उभी राहिली. इतक्यात तिला ती कुमारी दिसेनाशी झाली. ही माया आहे, भ्रम आहे, असे समजताच माया किवा भ्रम जसा पार नाहीसा होतो त्याप्रमाणे ती कोठे नाहीशी झाली पुढे तिने आपल्या प्रेतरूपी पतीचे मुख पाहिले व त्याबरोबर सग्रामात सिंधूनें ज्याला मारिलें तोच हा माझा पति आहे, असे तिला वाटले व हे आपले वाटणे खरे आहे, असाही तिचा निश्चय झाला. आपला हा प्राण- नाथ शत्रूशी युद्ध करीत असताना सन्मुख मरण पावल्यामुळे या वीरलो- कास प्राप्त झालेला असून यावेळी सुखाने निजला आहे व मी देवीच्या कृपेने येथे शरीरासह आल्ये, असा तिने तर्क केला. मी धन्य आहे, माझ्या- सारखी भाग्यवती दुसरी कोणी नसेल इत्यादि मनोराज्य करून ती पख्याने पतीस वारा घालू लागली. (आता सेवकादि जन तिच्या विषयी काय बोलतात ह्मणजे ही आज नवीन कोण व कोठून आली ? राजाने हिला कसे ठेवून घेतले ? इत्यादि भाषणे ते आपसात करितात की नाही ? असा लीलेने वर प्रश्न केला होता, त्याचे उत्तर देवी देते.-) श्रीदेवी-लीले ही कोणी अपूर्व स्त्री आली आहे, असे जर त्यास चाटते तर ते तिच्याविषयी व राजाविषयी असे कुतर्क काढते. पण आमच्या प्रभावाने त्याना ही कोणी नवीन स्त्री आली आहे. अमें मुळी वाटलेच नाही. तर ब्रह्मचैतन्य भोक्याच्या अदृष्टाप्रमाणे विवर्त पावत असल्यामुळे, प्रत्येक जीव " याने असे व्हावें" याने असेंच व्हावें " इत्यादि नियति-नामक ईश्वरसकेताच्या अधीन अम- ल्यामुळे आणि साक्षि चिदाकाश त्यातील प्रत्येकाच्या बुद्धीत एक- सारिखेंच प्रतिबिबित झाल्यामुळे राजा, प्रजा, त्याचे सेवक इत्यादि सर्वास परस्पर पूर्वीप्रमाणेच प्रतिभास होत आहे. राजा म्हणतो-