पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९० बृहद्योगवासिष्ठसार. ल्पिक स्थानी जाण्याविषयी उत्सुक होऊन सूक्ष्म नाडीमार्गाने ' स्थूल शरीरास सोडून गेला. पुढे जीवात्मरूपानें हिने चित्ताने केलेला ( अर्थात् उत्तरशरीर-गमनरूप ) सकल्प याच ब्रह्माकाशात पाहिला. साराश, याप्रमाणे ती कामिनी असल्याच रमणीय शरीराने युक्त होत्साती पद्माच्या ब्रह्माडामध्ये जाऊन पतियुक्त झाली आहे ५२. सर्ग५३-लीलेच्या गमनाचा मार्ग व तिला झालेली पतीची प्राप्ति याचे येथे वर्णन करून अज्ञानी प्राण्याची गति अतःरिक्षातून होत नाही, असे सागतात. श्रीवसिष्ठ-रामा, जिला देवीचा वर मिळाला आहे अशी ही येथील लीला वर वर्णिलेल्या वासनामय देहानेंच, ' मी आपल्या पतीस मिळण्या- करिता नभोमार्गाने पुढे सागितलेल्या भुवनास जात आहे' अशा स्मरणाने देहादि भावास प्राप्त होऊन मोठ्या उत्साहानें पक्षीणीसारिखी अतरिक्षात उडाली. तेव्हा तेथे आपल्याच सकल्परूपी महा आरशाच्या पुढे आल्यासारखी ज्ञप्तीनंच पाठविलेली एक कुमारी तिला भेटली व ह्मणाली, " हे ज्ञप्तीचे मैत्रिणि, मी तुझी कन्या आहे. सुदरि, तुझे स्वागत असो. मी तुझीच वाट पहात येथे ( नभोमार्गात ) उभी आहे. ', त्यावर लीला ह्मणते-हे देवि, मला पतीजवळ घेऊन चल. कारण तुझ्यासारख्या मोठ्याचे दर्शन कधी व्यर्थ होत नसते. रामा, तें ऐकून ती कुमारी " बरे आहे. चल आपण जाऊ" असें बोलून आकाशात मार्ग दाखविण्याकरिता तिच्या पुढे झाली. तिच्या मागोमाग जाणारी लीला ब्रह्माडछिद्रात शिरली. मेघमार्ग, वातस्कध, सूर्यमार्ग, तारामार्ग, आणि वायु, इद्र, देव, सिद्ध, ब्रह्मा, विष्णु, व महेश याचे लोक या सर्वांचे उल्लघन करून ब्रह्मांडाच्या बाहेरील आवरणास येऊन पोचली घटातील जलाचा गारठा घट फुटका नसला तरी बाहेरच्या बाजूस हार लाविताच अनुभवास येतो. त्यामुळे तो बाहेर आला असें ह्मणता येते त्याप्रमाणेच सकल्पाने सिद्ध असलेली ती ब्रह्माडाच्या बाहेर आली. पण हे तिचे गमन चित्तकल्पनामात्र होते, हे विसरता कामा नये. ब्रह्मांडाच्य बाहेरील जलादि आवरणाचे उल्लघन करून ती मायायुक्त चिदाकाशा आली. (तें चिदाकाश किती अपार आहे, याची कल्पना व्हावी ह्मण घर एकदां " गरुड एकसारिखा एक कल्पभर जरी धावत असला त