पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५२. २८९ आहे.. देहसबधामुळे दुःख होते, हे प्राण्यास स्वभावतःच म्हणजे कोणी न शिकविता समजत असते व शरीराच्या वेदाना असह्य झाल्यास किवा त्याचे निमित्त झाल्यास, त्याच्याशी असलेला आपला सबध सोडण्यास जीव सर्वदा तयार असतो. आणि म्हणूनच मर्मस्थानी प्रहारादि होताच जीव मून्छित होत असल्याचे आपण पहाता. सारांश, सुखाच्याच आशेने शरीर हवेसे वाटते. दुःखाकरिता ते कोणालाही नको अ- सते. त्यामुळे क्षणभर झालेल्या असह्य दु.खानेही जीव शरीरत्याग करण्यास तयार होतो. आता ही गोष्ठ खरी आहे की, दुःखे सहन कर-करून निग- रगट्ट बनलेला जीव सामान्य दु खास किवा चित्ताच्या आधीस दुःख सम- जतच नाही. पण नियामक शक्तीने उत्तरोत्तर अधिक असह्य दुःखें व त्याचे उपाय सृष्टीत योजून ठेविलेले असल्यामुळे त्यात अति दु.खे भोग. णान्या जीवासही या शरीराचा त्याग करावा, असे वाटण्यासाखी असा दुःखे असतात व त्यामुळे त्याला अती " आता मला मरण येईल तर बरे " असे वाटते. देहाभिनिवेश मोठा कठिण आहे. अनेकदा मरणाचे दुख सहन केलेले असल्यामुळे कीड-मुगीपासून व्यावहारिक विद्वानापर्यंत प्रत्येक जीवास आपल्या शरीराचा नाश होऊ नये, या शरीराची व प्राणाची ताटातूट होऊ नये तर त्याचा सबध सदा असावा, असे उपजत ज्ञान असते. हाच अभिनिवेश होय. याच्या योगाने जीव अगदी शेवटपर्यत शरीरत्याग करण्यास तयार होत नाही पण शवटी एकदा अनेक क्लेश सहन करूनही बाळगलेले व पोशिलेले . शरीर सो. डावे लागते. असो, याप्रमाणे जीवास शरीरत्याग करण्याचा जेव्हा नि- रुपायास्तव, प्रसग येतो तेव्हा त्याचा अगुष्ठ परिमाण लिंगदेह प्राण वं उत्तर जन्माचा सकल्प यानी युक्त होत्साता परलोकाम जातो. प्राण गतिमान् असल्यामुळे जीवाचे उत्क्रमण ( देहास सोडून जाणे ) त्यान्या अधीन असते. अगोदर वाणी, श्रोत्र इत्यादि सवे करणे प्राणात लीन होतात. नतर त्यास जन्मभर अभ्यामाने दृढ झालेल्या सकल्पाप्रमाणे अत्य मति होते. तिलाच हृदयान-प्रद्योतन ह्मणतात व इतकी पूर्व तयारी झाली ह्मणजे जीव नेत्र, कर्ण इत्यादि शरीरद्वारातील कोणत्या तरी एका द्वारातून निघून आपल्या सकल्पित स्थानी जानो, असा नियम आहे. त्याप्रमाणे हिचा सूक्ष्म देहमय जीवही प्राणरूप होऊन व साक-