पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८८ बृहद्योगवासिष्ठसार. आतिवाहिकाची कल्पना वस्तुतः प्रातिभासिकच असते. पण चित्त जेव्हा दृढवासनेमुळे व्यावहारिक भावाचा अनुभव घेते तेव्हा त्या अनु- भवाच्या बलानेच चेत्य (दृश्य ) सत्य होते. पण विवेकजन्य ज्ञानाच्या अभ्यासाने जेव्हां आधिभौतिक ( व्यावहारिक ) भाव असत् (मिथ्या ) आहे, असे चित्त जाणते तेव्हा त्या दृढवासनेमुळे प्रप- चाविषयींचा आतिवाहिक सकल्प प्रातिभासिक आहे, असा निर्णय होतो. असो; पुढे मरणाचा अनुभव घेऊन पुनर्जन्ममय भ्रम झाला असतां याने तुला जाणिलें व वासनामय दुसऱ्या लीलारूपी तुझ्याशी त्याचा समागम झाला. तूही आपल्या वासनामय अशा याला पाहिलेंस. चिदात्मा सर्व वासनामध्ये अनुगत असल्यामुळे तूही आत्म्यामध्येच विवर्त रूपाने झाली आहेस. साराश ब्रह्म सर्वशक्तिमय असल्यामुळे जेथे ज्या शक्तीची कल्पना करावी तेथे त्याप्रमाणे दृढवासनेच्या बलाने अनुभव येतो. अर्थात् आपली वासना हेच सर्व अनुकूल किंवा प्रतिकूल अवस्थेचे कारण आहे. या दोघास जेव्हा आपापल्या मरणानुकूल मूर्छा आली तेव्हा त्याक्षणीच याना हे सर्व चित्तात भासले. ह्मणजे आमचा हा पिता, ही माता, हा देश, हे धन, हे कर्म, आमचा असा विवाह झाला, आम्ही असे एकतेस प्राप्त झालों इत्यादि सर्व त्यास त्या क्षणींच भासले. या सर्वा- विषयी स्वप्न हाच एक उत्तम दृष्टात आहे. लीले, " मी विधवा होऊ नये" या उद्देशाने हिने माझी उपासना केली व त्याप्रमाणे मीही तिला वर दिला. त्यामुळे ही बालिका याच्या पूर्वी मरण पावली. तुझी व्यष्टिचेतनाश आहा व मी तुमचा समूह आहे. (म्हणजे समष्टिरूप हिरण्यगर्भ चेतना आहे) मी तुम्हा सर्व जीवाची कुल देवता असून सर्वांस पूज्य आहे. मी प्राण्याच्या कर्माप्रमाणे घडामोड स्वतः करीत असते. (असो, येथवर तेथे पूर्वी कशी गेली? या प्रश्नाचे उत्तर देऊन आता ती देहयुक्त कशी झाली, ते देवी सागते.-) आता या देहात रहाणे अशक्य आहे, असें असह्य पीडा सहन केल्यावर, जेव्हा जीवास वाटते तेव्हा तो शरीरास सोडण्याची इच्छा करितो. शस्त्रादिकांच्या प्रहाराने एकाएकी प्राण जातो, असें पुष्कळदां अनुभवास येते. पण एका क्षणातही असह्य दुःख होणे व त्यामुळे देहाचा कटाळा येणे, ही होऊ शकतात. मूर्छा हा जीवांस असह्य दुःख भासू नये म्हणून ईश्वराने योजिलेला उत्तम उपाय आहे व मूर्छा हे मरणद्वार