पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५२. २८७ तुझ्या समोर जेव्हां मूर्छा भाली तेव्हाच ही आपल्या पद्मसंज्ञक पतीच्या शवाजवळ गेली. लीला-देवि, ही तेथें पूर्वी कशी गेली ? सपत्नीकभावास प्राप्त होत्साती तेथें कशी राहिली ? त्या श्रेष्ठ गृहात रहाणारे सेवकजन तिला कोणत्या रूपाने पहातात १ व तिच्याशी कसे बोलतात, ते मला सक्षे- क्तः सांग. श्रीदेवी--लीले. दसरी लीला झालेल्या तुझाच सर्व वृत्तात तूं ऐक. त्याच्या योगाने सर्व गूढें उकलतील व मरण, परलोकगमन इत्यादि दुर्दशा चागल्या त-हेने पाहणे शक्य होईल. हे नगर, राष्ट्र, लोक इत्यादि रूपाने दिसणारी ही जगन्मय भ्राति विदूरथ झालेल्या या तुझ्या पासज्ञक पतीस त्या शवाश्रय-गृहात दिसत आहे. हे तू पाहिलेले युद्ध स्वप्नयुद्धाप्रमाणे, भ्रातिमय आहे. ही लीलाही भ्रातीने भासत आहे. हा सर्व जनसमूह जन्म- मरणादि भावशून्य आत्माच आहे. त्यामुळे या सर्वाचे मरण भ्रातिकल्पित आहे. हा ससारही काल्पनिक आहे. ही लीला याची दयिता भ्रमानेच झाली. तुझा व पद्माचा विवाह हे सुद्धा स्वप्नच. हा तुझा दोघींचा भर्ता, ही कल्पना होय. फार काय पण मी स्वतः सुद्धा स्वप्नातील पदार्थाप्रमाणे आहे वसे, जगाची शोभा ही अशी आहे. हिलाच दृश्य ह्मणतात. पण हे गूढ समजले झणजे ते दृशीचे कर्मच होत नाही. ह्मणजे दृश्य या शब्दाचा अर्थ नाहीसा होतो. दृकशक्तीचे कर्म होणे, विषय होणे, हाच दृश्य या शब्दाचा अर्थ आहे. आत्मा सर्वरूप (पूर्ण) असल्यामुळे ही ससारस्थिति व तू, मी, हा, ती इत्यादि भाव त्याचे ठायीच कल्पित आहेत व त्याच्या सत्यत्वामुळेच सत्य भासतात. हे आपण सर्व जसे परस्पर अनुग्राह्य-अनुप्राहकभावाने बद्ध होऊन याप्रमाणे चैतन्याच्या मिथ्या कल्पनास्थितीमुळे अशा त-हेचे झालो आहों तशीच ही राणी झाली. ती अति सुदर व सर्व गुणसपन्न निपजली, तुझ्या विषयी सकल्प करणान्या तुझ्या या पतीची जेव्हा मनोवृत्ति व वासना उद्भवली तेव्हाच ही तुझ्या आकाराची लीला चिच्चमत्कारामध्ये उत्पन्न झाली. ह्मणजे तुझा पति मेल्यावर लागलीच तुझ्याविषयी सकल्प करणाऱ्या त्याने हिला पुढे पाहिले. (ह्मणजे ही त्याच्या वासनामय आहे. तर मग अशा त्या वास- नामय स्त्रीचा त्याला अनुभव कसा आला ? ह्मणून ह्मणशील तर सांगते.-)