पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८६ बृहद्योगवासिष्ठसार. आधेय (पदार्थ) सत्य आहे आणि आरशासारिख्या लहान आधारांत प्रतीत होणारा पर्वतासारिखा किंवा राजासारिखा मोठा पदार्थ असत्य आहे, असें झणतात. त्यामुळे परिछिन जग परिछिन्न ( अल्प ) हृदयाकाशात रहाणे शक्य नसल्यामुळे तें मिथ्या आहे, हे जसें निःशंकपणे ह्मणता येते, तसें सर्वव्यापी व सर्वाधार ब्रह्माविषयीं ह्मणतां येत नाही. द्रष्टा व दृश्य या दोन्ही भावानी रहित आणि त्या दोघांचेही आधारभूत असे ब्रह्म स्वभावतःच अद्वय आहे, शात आहे, शुद्ध आहे, आनंदस्वभाव आहे व स्वप्रकाश आहे. जगात दिसणारा हा सर्व व्यापार मूर्त (साकार ) वस्तूंचा आहे. मंडपाकाशांत आपापल्यास अनुकूल अस- लेली व्यवस्था कल्पून हे सर्व प्राणी व्यवहार करीत असतात. पण तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास त्या परब्रह्माचे ठायीं जग नाही, उत्पत्ति नाही व त्यातील प्राणी नाहीत आणि वस्तुस्थिति अशी असल्या- मुळे अनुभवात्मक-प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होणारें में अहकाराचेही साक्षि- भूत चिदाकाश तेच अज्ञाच्या दृष्टीने जगद्रप होते, असा तूं निश्चय कर. विद्वानाच्या अनुभवाने जगाचे मिथ्यात्व सिद्ध होणे, हे त्याविषयी प्रत्यक्ष प्रमाण असून " हे सर्व दृश्य आत्मस्वरूप ज्ञानमात्र आहे. आपणास जसे दिसते तसे ते स्थूलाकार नाही. कारण एवढे स्थूल ब्रह्माड व त्यातील पर्वत-समुद्रादि स्थूल पदार्थ जेथें रहाणे शक्य नाही अशा सकुचित प्रदेशी त्याची प्रतीति येत असते. देहाच्या आत पाहिलेल्या स्वप्नाती नगराप्रमाणे." हे अनुमान प्रमाण आहे. (आता स्वनामध्ये सर्वानुभव सिद्ध व्याप्ति दाखवितात. ) स्वप्नामध्ये आत्म्याचा चैतन्याभास कठ प्रदेश असतो. ह्मणजे जाग्रतीचे जसे नेत्र हे स्थान आहे तसे स्वप्नाचें क स्थान आहे. यास्तव हृदयापासून कठापर्यंत जो टीचभर प्रदेश आ त्यात असलेले चैतन्यच पर्वतादिमय अनेक जगद्रप झाले आहे, अ सर्वजण स्वप्नात पहातात. त्याचप्रमाणे अणु आत्म्यामध्ये असख्य जगें सभा तात. तात्पर्य स्वप्नसृष्टीप्रमाणे चैतन्याच्या अणूमध्ये त्रिभुवन रहाते. त्य अनेक चैतन्याणु असतात व त्या प्रत्येकात एकेक जग असते. तशा प्रव रच्या जगातील ज्या एका जगात हा पद्म शव होऊन राहिला आहे तेथे तुझी सवत लीला या राज-जीवाच्या पूर्वीच जाऊन पोचली आहे. हि