पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५२. २८५ सात ) विंध्य पर्वतावरील प्रामात वसिष्ठ ब्राह्मणाचे आकाश आहे. तेच पडपाकाश होय. त्यात पद्माचे जग व अत:पुर आहे व त्याच्याच एका भागात हे विदूरथाचे राष्ट्र स्थित आहे. सारांश अशा प्रकारचा हा अवाढव्य जगत्त्रयमय भ्रम झाला आहे. एकात दुसरें, दुसऱ्यात तिसरे अशा प्रकारे होणारी याची उत्पत्ति काल्पनिक आहे. चैतन्यामध्ये आकाशासह हे सर्व भासतें. पण विषय मिथ्या आहेत, असें निश्चयाने समजले ह्मणजे चितियुक्त रूपच रहात नाही. त्यामुळे निर्विषय चिन्मात्र अव- शिष्ट रहाते व तेंच उत्पत्ति-विनाशरहित परम पद अथवा मुख्य ज्ञेय आहे, असें तू समज. ते स्वयप्रकाश तत्त्वच मडप-गेहामध्ये, आपल्या चिन्मात्र स्वभावाने व्यक्त झालेल्या आत्मस्वरूपात, अनुभवास येते. अग वेडे. मडपातील भूताकाशातही जर जगत् खरोखर नाही तर शुद्ध चिदाकाशात ते नाही, हे काय सागावे ? आता-अल्प वस्तूमध्ये मोठ्या वस्तूचा समावेश होणे शक्य नसल्यामुळे मडपाकाशात (ह्मणजे हृदयस्थ सूक्ष्म भूताकाशात ) प्रतीत होणारे जग भ्रम आहे, असे झटल्यास त्यातच प्रतीत होणारे सर्वव्यापी ब्रह्मही भ्रमरूप आहे, असे ह्मणावे लागेल, असें कदाचित् तू, शास्त्र व आचार्य याच्या उपदेशाने, ह्मणशील, पण ते बरोबर नाही. कारण भ्रमाला पहाणारा कोणीतरी पाहिजे, त्या- वाचून भ्रमाची सिद्धि होत नाही. ब्रह्म भ्रम आहे, असें झटल्यास त्यास पाहणारा कोण ते सागितले पाहिजे. ब्रह्माहून दुसरा कोणी त्यास पहातो, असें झटल्यास अनेक चैतन्याची कल्पना व्यर्थ केल्यासारखे होते. अद्वैत- सिद्धांतात सोपाधिक चैतन्यच द्रष्टा, असे मानिलेले आहे. यास्तव शास्त्र व आचार्य याच्या उपदेशानें, वस्तुत: तो(दृष्टा)च निरुपाधिक ब्रह्म आहे, असें साक्षात् जाणिल्यानेही ब्रह्मप्रतीति भ्रम होऊ शकत नाही. शिवाय वस्तुतः ब्रह्म निर्विशेष आहे व ते सर्वांचा आधार आहे. यास्तव अल्प, महत, मध्यम इत्यादि सर्व कल्पनामध्ये ते असते. जगाची स्थिति तशी नाही. तें ब्रह्माप्रमाणे अपरिछिन्न नाही. तर परिछिन्न आहे. एका परिछिन्न पदार्थास दुसऱ्या परिछिन्न पदाथीत रहावयाचे झाल्यास त्या आधारभूत पदार्थाचे परिमाण योग्य आहे की नाही ह्मणजे आधेया( ठेवावयाच्या पदार्था )पेक्षा आधार ( ज्यात तो ठेवावयाचा तो पदार्थ ) मोठा आहे की लहान हा विचार उद्भवतो व मोठ्या आधारात प्रतीत होणारा लहान