पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ बृहद्योगवासिष्ठसार. मनमराद लूट केली. राजाचा निधि (खजीना ), सिंच्या लोकानी. अनेक रक्षक-वीरास केळीच्या खांबांप्रमाणे सटासट कापून, आपल्या अधीन करून घेतला. आपल्या राजाचे शासन (आज्ञा) मान्य करणान्य लोकास अभय देऊन, त्यास प्रतिबंध करणाऱ्या व राजाशी द्रोह करणान्या काही प्रतिपक्षियांस त्यानी राज्याच्या आज्ञेनें देहात शासन केलें. केवळ तीक्ष्ण उपायानी प्रजा शात होणे शक्य नाही, असे बऱ्याच अनुभवाने सिधु राजास पूर्वीच समजलेले असल्यामुळे त्याने पुष्कळ गुणी लोकास, त्याचे अपराध विसरून, क्षमा केली व क्षमा, दया, औदार्य, इत्यादि सात्त्विक व निरुपद्रवी भावाचा आश्रय केल्यामुळे सर्व राष्ट्र त्याच्या अधीन झाले तेव्हा त्या नूतन राजानेही सर्व प्रजाजनास पुत्राप्रमाणे पाळण्याचे अभि वचन दिले. येणेप्रमाणे सर्वत्र स्वस्थता होऊन भूलोकास मनुष लोकाचे स्वरूप पुनः प्राप्त झाले आणि सिंधु सार्वभौम राजा झाला १८, ४९,५०, ५१. सर्ग ५२.-या सर्गात विदूरथाच्या ससाराचे मिथ्यात्व व त्या नगरातील लोलेर __ वासनारूपता याचे वर्णन केले आहे. श्रीवसिष्ठ-राघवा, आता, विदूरथाची काय अवस्था झाली आणखी पुढे काय काय घडले ते मी तुला सागतो. सिधु परत फिरल असता व राजाचा अतकाल अगदी समीप आला असता ज्याचे केव श्वासमात्र अवशिष्ट राहिले आहेत अशा आपल्यापुढे असलेल्या भाक पाहुन लीला देवीस म्हणाली, "जननि, हा माझा प्राणनाथ देहत्या करण्यास प्रवृत्त झाला आहे." तें ऐकून ज्ञप्ति देवी म्हणाली- वत्से, घोर रण, हा नगरदाह, ही तुझ्या पतीची विपत्ति, ही आता होत असले अथवा पुढे होणारी राजक्राति, इत्यादि सर्व जरी खरोखर झाले अ तुला व दुसऱ्या सर्वानाही वाटले तरी यातील एकही गोष्ट झालेली नाह हे राष्ट्रही नाही व हे भूतल नाही. त्यांची उत्पत्ति, स्थिति व लय सर्व भ्रम आहे. हे जग स्वप्नात्मक आहे. पूर्वी पाहिलेल्या मडपाकाश पद्मराजाचे शव असून त्याच्या निकटाकाशात तुझ्या पतीच्या जीव हे भूतलगत राष्ट्र भासत आहे. म्हणजे विदूरथाचें ब्रह्माड पद्माच्या अर पुरात स्थित आहे व ज्याचा अतर्भाग राष्ट्राने युक्त आहे, असें तें पद्मा ब्रह्माड वसिष्ठ ब्राह्मणाच्या गृहांत आहे (आता हीच गोष्ठ उलटून सांग