पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४८-५१. २८३ यास त्या पूर्व कर्मीचे स्मरण नसल्यामुळे ते सर्वस्वी तुझ्या सकल्पावर सर्व भार टाकितात. पण विचार करून पाहिल्यास तुझ्या सकल्पास दोष देता येत नाही. तर आपल्या पूर्व कर्मीचाच हा सर्व विपाक आहे, असा निश्चय होतो. पण देवि, मी आता काय करू ! झाले; माझें सर्वस्व नष्ट झालें. मी आता जीवंत असूनही मृततुल्य झाले. हर हर! हे दुःखही नको व ते राज्यही नको आणि हे दुःखदायी प्राणही नकोत, असे ह्मणून ती कोमल राजपत्नी भूमीवर मूर्च्छित होऊन पडली. इकडे विदूरथही पाय तुटले होते तरी मोठ्या धैर्याने शत्रूवर तीक्ष्ण शस्त्राचा प्रहार करीतच होता. पण त्याच्या हातून आता काय होणार, हे समजलेच होते. रामा, शेवटी तो दुर्दैवी राजा, ज्याची मूळे तोडली आहेत अशा वृक्षाप्रमाणे. रयांतच पडला. तेव्हा त्याच्या कृतज्ञ व चतुर सारथ्याने त्याचा रथ रणा- गणातून काढून एकीकडे नेला पण त्या उद्धट सिंधूने त्या विन्मुख रथाच्या मागोमाग जाऊन विदूरथाच्या कठावरही तीक्ष्ण प्रहार केला. तेव्हा ज्याचा गळा अर्धवट तुटला आहे अशा त्या राजाची सर्वानी आशा सोडिली. सारथ्याने रथ वेगाने चालविला सिंधूही त्याच्या मागून येतच होता. पण सुदैवाने तो राजगृहात येऊन पोचला. देवीच्या विलक्षण प्रभावामुळे सिंधूला राजमदिरात प्रवेश करिता आला नाही असो, याप्र- माणे विदूरथाने युद्धसबधी सर्व पौरुष करून रणागणी उत्तम क्षत्रियास शोभेल, असे वर्तन केले. पण दैव प्रतिकूल असल्यास पौरुष जसे व्यर्थ होते त्याप्रमाणे त्याचे सर्व युद्ध-चातुर्य व्यर्थ झाले. गळा तुटल्यामुळे त्याचा मरणकाल जवळ आला. त्याचे सर्व अग व वस्त्रे रक्ताने भिजून गेली होती. सूताच्या महकृत्यामुळे तो प्राण सोडण्याम आपल्या सुदर गृहात आला व शेवटी पवित्र मृदु शय्येवर भगवती ज्ञप्ति देवीच्या सन्मुख मृत्यूची वाट पहात पडला आणि या भव्य व दैवीशक्तीने सुरक्षित असलेल्या गृहात आपला प्रवेश होत नाही, असें जाणून, सिधुही परत गेला. इकडे नगरामध्ये सैन्यांतील लोकात "आमचा राजा मेला, भामचा राजा पडला " अशी एकच हाकाटी झाली “राजाधिराज सिंधुमहारा- जांचा जय-जयकार असो." असें ह्मणून प्रतिपक्षांतील लोकही गर्जना करू लागले. तेथल्या लोकांत पूर्व रात्रीप्रमाणे पुनः अत्याचार सुरू झाले. धन, स्त्रिया व इतर मूल्यवान् भोग्य वस्तु याची शत्रूनी