पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ बृहद्योगवासिष्ठसार. अनुयायी — हाय, हाय ' करू लागले. इकडे विदूरथाची स्त्रीही भानदाने देवीस ह्मणाली, " भगवति, पहा, पहा; माझ्या प्रिय पतीने नृसिंहा- प्रमाणे आचरण करून आपल्या शत्रूस भूमीवर लोळविले आहे. याचा उर फुटून त्यातून रक्त वहात आहे. तो पहा त्याच्या हितकर्त्यांनी त्याच्या- करिता दुसरा रथ आणिला आहे. अरे हा तर राक्षस अजून जिवत आहे. मी झटले की, तो अगदी मरणोन्मुख झाला असेल. त्याला हात- पाय हालविण्याचीही शक्ति नसेल. पण पहातें तो रथ जवळ येतांच तो आपल्या पायानी उठून वर चढू लागला. धन्य आहे बाई याच्या वीर्याची! । देवि, पाहिलेंस का ? माझ्या प्रिय पतीने काय केलें तें ? आपल्या मुद्ग- राच्या आघाताने त्याने तो रथ मोडून टाकिला. वा ! फार चगले झाले आमच्या वीरानीही राजाकरिता दुसरा सुदर रथ आणला ! तो पहा, माझा प्राणनाथ त्यात चढत आहे. पण दुर्दैवी पुरुषाच्या मनोरथाप्रमाणे त्यास तोडून टाकण्याकरिता सिवु त्याच्यावर मुसळ फेकीत आहे. ओ, हो. माझ्या धन्याने त्याच्या मुसळास एकीकडे उडवून आपल्या रथावर आरो- हण तर केले. अरेरे, मोठा कठिण प्रसग ओढवला. या दुष्टाने माझ्या प्रियावर भयकर शरवर्षाव करण्यास आरभ केला आहे. हर हर, आमच्या रथाचा ध्वज मोडला, घोडे मेले, सारथि पडला, चाके तुटली व तीक्ष्ण बाणान्या योगाने माझा स्वामी व्याकुळ झाला. आता काय करू ? शिले. सारख्या कठिण छातीस भोके पाडून त्याच्या विशाल मस्तकावरही त्याने निष्ठरपणाने बाण मारिले आहेत. वज्रासारख्या असह्य बाणाच्या प्रहारा- मुळे व्याकुळ होऊन माझा पति भूमीवर पडला. अरे दैवा, काय हा घोर प्रसग! देवि, राजा सावध होत आहेसे वाटते होय, तो पहा, पुनः सावध होऊन दुसऱ्या रथावर चढत आहे. हाय हाय, सिंधूने त्याच्या स्कधावर तीक्ष्ण घाव घातला. त्यामुळे त्याच्या अगातून रक्ताच्या धारा वहात आहेत अरे देवा, आता तर पुरा घात झाला नको नको, मला आता हे युद्ध पाहणं नको. या निर्दयाने माझ्या प्राणाचे पाय कीहो तोडले !! आता करवतीन कापलेल्या वृक्षाप्रमाणे तो धाडकन् खाली पडला तर त्यांत आश्चर्य । काय आहे ! हाय हाय ईश्वरा, तुझा सकल्प कोणालाही समजणे शक नाही व त्याच्या विरुद्ध जाण्याचीही कोणाची शक्ति नाही. वस्तुतः तुइ सकल्प प्राण्याच्या पूर्व कर्माप्रमाणेच होत असतो, हे जरी खरे आहे, त