पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४८-५१. २८१ आपले अस्त्र व्यर्थ गेले, ह्मणून कोपयुक्त झालेल्या सिंधूने भयकर नागास्त्र सोडले. तेव्हां गरुडास्त्राचा प्रयोग करून विदूरथाने त्या विषारी प्राण्याच्या भीतीपासून तेथील लोकांस सोडविले. त्यानतर सिधूने तमोऽस्त्र सोडून शत्रूच्या परिवारास जणुकाय अंधकुपातच लोटिले. पण मत्रवेत्त्या विदूरथाने मार्तडास्त्राचा प्रयोग करून, ब्रह्मनिष्ठ गुरु अनन्य शिष्याचे अज्ञान ज्ञानाच्या योगाने जसे घालवितो त्याप्रमाणे, त्या क्लेशकारक अधकारास नाहीसे केले पुढे त्याच्या शत्रने भयकर राक्षसास्त्र सोडले. न्यामळे रणागणातील वीरास व युद्धचमत्कार पाहणाऱ्या लोकास असख्य विक्राळ राक्षस दिसू लागले. आपले सर्व लोक भयभीत झाले आहेत, असे पाहून लीलेच्या पतीने राक्षसाचा सहार करणारे नारायणास्त्र जपले. तेव्हा त्या भयकर व दुष्ट प्राण्याचा मागमूम नाहीसा झाला. तात्पर्य येणेप्रमाणे त्यानी एकमेकावर अनेक दिव्य अस्त्रे सोडिली व दोघानीही त्याचे निवारण केले. फार काय पण त्यानी वैष्ण- वास्त्राचाही प्रयोग केला. पण दोघेही समबल व सारखेच तपस्वी आणि पुरुषार्थी असल्यामुळे त्यातील एकही हटेना. दोघाचाही युद्धो- द्योग तेथील सर्व प्राण्यास, मूर्खाच्या क्रोधाप्रमाणे, त्रासदायक झाला. इतक्यात विदूरथाने मोठ्या त्वरेने शत्रूचें अस्त्र निष्फळ करून अग्न्यस्त्र पुनः सोडिले. त्याच्या योगाने सिंधूचा रथ जळून गेला. तेव्हा तो वीर, वारवार विघ्नं आली तरी अगीकृत कार्य न सो- डणाऱ्या सज्जनाप्रमाणे मनात यत्किंचितही खिन्न न होता, हातात ढाल- तरवार घेऊन आपल्या रिपूच्या रथावर धावला. त्याने अगोदर मोठ्या चपलतेने विदूरथाच्या रथास जोडलेल्या घोड्याचे खूर तोडून टाकिले. तेव्हा विदूरथासही त्याच्याप्रमाणेच ढाल-तरवार धेऊन रथाखाली उतरावे लागले. त्यानतर त्याचे भूमीवरील द्वद्वयुक्त मुरू झाले. ते दोघेही एकाच प्रकारची आयुधे उचलून तुल्य-उत्साहाने एकमेकास मारण्याकरिता प्रयत्न करू लागले त्याच्या तरवारींचे अनेक घाव एकमेकाच्या तरवारीवर पडून त्या करवतीसारख्या झाल्या. तेव्हा विदूरथाने हातातील खड्ग टाकून एक तीक्ष्ण शक्ति सिंधूवर फेंकिली. तिच्या योगाने सिधूचे हृदय विदीर्ण झाले व तो रक्त ओकून भूमीवर निश्चेष्ट होऊन पडला. विदूरथाचे हे अद्भुत कर्म पाहून त्याच्या योद्धयांनी त्याचा जयघोष केला व सिंधूचे