पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८० बृहद्योगवासिष्ठसार. टाकण्याचा सपाटा चालविला. विदूरथाचे युद्ध-कौशल्य विलक्षण होते. समुद्रा- पासून जलप्रवाह, सूर्यापासून किरण, सोसाट्याचा वारा चालला असता वृक्षापासून पुष्पे, तापवून लाल केलेल्या लोखडावर घणाचे प्रहार केले असता त्यापासून ठिणग्या, मेघापासून धारा व निर्झरापासून तुषार जसे निघतात त्याप्रमाणे त्याच्या धनुष्यापासून बाण एकसारखे निघत होते. न्या वीराचे तें हस्तलाघव पाहण्याकरिता दोन्ही सैन्यातील लोक चित्रासा- रिव स्थिर राहिले. त्याचे अतरिक्षात वेगाने जाणारे बाण उल्केप्रमाणे देदीप्यमान दिसत होते. त्याच्या धनुष्यापासून निघणारा तो बाणप्रवाह रजमदिरातून पाहून त्या नगरांतील लीला, देवीस मोठ्या आनदाने ह्मणाली, "देवि, तुझा जय-जयकार असो. माझ्या स्वामीचा पराक्रम पाहि- लाम का? या त्याच्या बाणवृष्टीने मेरूचेही चूर्ण होईल. मग या क्षुद्र मनु- घ्याची काय कथा? आमच्या स्वामीचा आज खचित जय होणार, असे मला वाटते " रामा, जिने पूर्वी कधी असले युद्ध पाहिले नव्हते त्या लीलेचे हे भाषण ऐकून त्या दोघी देवी मनात हसू लागल्या. पण त्यानी तिला काही उत्तर दिले नाही. त्या दोघीही युद्धचमत्कार पहाण्यात गुग झाल्या होत्या, असे दिसले. इतक्यात सिधुराजानेही आपला प्रभाव दाखविला. विदूरथाची ती सर्व बाणवृष्टि आपल्या अमोघ शरसधानाने निष्फळ करून सोडिली. अगस्त्यमुनींनी सागराची किवा जतने मदाकिनीची जी अवस्था केली ताच त्याने त्याच्या असख्य बाणसमूहाची वाट लावली. राजाच्या दिव्य शराचेही त्याने बारिक बारिक तुकडे करून टाकिले. त्यामुळे दिवा विझला असता तो जसा कोठे गेला हे समजत नाही त्याप्रमाणे त्याचे ते बाण कोठे गेले हे कळेना नंतर सिधूने मेघास्त्राने आकाश अभ्राच्छादित केले. विदूरथाने त्याचे निवारण केलें. एक प्रहरभर त्या दोघाचा काल एकमेकाच्या घातुक बाणाचे निवारण करण्यातच गेला. हे दोघे समानबल आहेत, अशी सर्व प्रेक्षकाची खात्री झाली. इतक्यात सधि साधून सिधूनें गधर्वाच्या प्रेमामुळे प्राप्त झालेलें मोहनास्त्र आपल्या प्रबल शत्रूवर सोडिले. त्या अस्त्राच्या योगाने एका विदूरथावाचून त्याचे इतर सर्व योद्धे मूर्छित झाले. त्यांना आपल्या शरीराचेही भान राहिले नाही. ते मेल्यासारखे किंवा चित्रासारखे निश्चेष्ट झाले. ते पाहून विदूरथाने प्रबोधास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे ते पुनः सावध झाले.