पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७८ बृहद्योगवासिष्ठसार. आजच्या संग्रामात आमच्या स्वामीस विजय न मिळण्याचे कारण काय ? नू त्याच्यावर प्रसन्न झाली आहेस. तेव्हां तुझ्या प्रभावाने त्यास यश मिळणे फारसे कठिण आहे, असे आम्हांस वाटत नाही." हे ऐकून देवी म्हणाली, "होय तुम्ही म्हणता तें खरें. पण या सिंधुराजाने विजय प्राप्त्यर्थ माझी फार दिवसांपासून आराधना चालविली आहे व या तुमच्या पतीने त्याकरिता माझी मुळीच आराधना केलेली नाही. त्यामुळे त्यास जय मिळेल व विदूरथाचा पराजय होईल. कर्माप्रमाणे फळ, ज्ञप्ति झणजे सर्व प्राण्याच्या मनोतर्गत सवित् ( अह असें सवेदन, भान, ज्ञान, ). त्या मज सवित्-सज्ञक ज्ञप्तीला जो जेव्हा जशी प्रेरणा करितो ( म. काम-कर्म-वासनाबलात् फल देण्यास उन्मुख करितो) त्यास तात्काल मी तसे फल सपादन करून देते. (ह्म. त्या फलरूपाने विवर्त होते) साराश प्रत्येक बरे वाईट फल प्रत्येकाच्या अधीन आहे. जो जशी प्रेरणा करील त्याप्रमाणे त्याच्या फलरूप होऊन रहाणे हा माझा स्वभाव अग्नीच्या उष्णतेप्रमाणे कधीही बदलत नाही. विदूरथाने “ मी मुक्त व्हावे " या इच्छेने माझी आराधना केली आहे. त्यामुळे मी त्याच्या प्रतिभारूप झाले आहे. तस्मात् तो मुक्त होईल व त्याच्या शत्रूच्या प्रतिभेप्रमाणे त्याला विजय मिळेल. विदूरथ या भायेंसह त्या देहास प्राप्त होईल व योग्य समयीं तुझा दोघीसह तो मुक्त होईल. या राजास समरागणी मारल्यावर सिधुराजा या भूमीचा स्वामी होणार, हे ठरलेलेच आहे. असो, रामभद्रा देवी असे बोलत आहे व दोन्ही सैन्ये युद्ध करीत आहेत इतक्यात जणु काय हा चमत्कार पाहण्याकरिताच सूर्य-भगवान् उदयाचलावर आला. त्याबरोबर विपत्तींतून मुक्त झालेल्या सज्जनाप्रमाणे भूलोक चमकू लागला. सकटप्रसगीही सत्त्वापासून न ढळलेल्या साध्वी स्त्रियाप्रमाणे दिशाची मुखें प्रसन्न झाली. सद्गुणाचा उदय झाला असतां दुर्गुण जसे आपलीं तोडे काळी करून निघून जातात त्याप्रमाणे अधकाराने पळ काढिला. वेदातनिष्ठ पडिता- पुढे जसे इतर शास्त्रज्ञ निस्तेज होतात त्याप्रमाणे शुक्र, गुरु इत्यादि तर राहू देतच, पण चद्रही तेजोहीन झाला. सूर्याचे रक्तवर्ण किरण भूमीवर पसरले. कोवळ्या उन्हामुळे लालभडक झालेले पर्वत, अनेक शस्त्रप्रहार सहन करून रक्तबंबाळ अंगाने शत्रुसंहार करण्याच्या इच्छेनें