पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४७. २७७ सेनापती आपल्या हाताखालच्या लोकांची स्तुति करून त्यास क्षत्रियाच्या धर्माचे स्मरण करून देऊ लागले. गर्दीतून चालणान्या अनेक प्राण्याच्या पायर्यापासून व रथचक्रापासून उडालेली धूळ अतरिक्षास व्यापून टाकू लागली. त्यावेळी या लोभी व अभिमानी क्षत्रियाच्या हातून निदेयपणे घडणान्या सहारास व रक्तपातास कटाळलेली भूदेवी आपले स्थान मोडून आकाशांत स्थानातर करण्याकरिताच निघाली आहे की काय, असा भास होत असे. लोकानी आग विझविल्यामुळे अनेक प्रकारच्या क्लेशात पडलेल्या त्या नगरातील लोकास गर्भवासातील यातनाप्रमाणे असह्य यातना भोगाव्या लागल्या. तारुण्यात अविवेकाचें जसे प्राबल्य असते त्याप्रमाणे त्या नगरात अंधकाराचे प्राबल्य झाले. नगरात रस्त्यावरून दिवे लाविले होते, पण दिवसा नक्षत्राची जशी अवस्था होते तशी त्या उडालेल्या धूळीमुळे त्याची अवस्था झाली. तेव्हा देवीने त्या विदूरथाच्या कुमारिकेस दिव्य दृष्टि दिली व त्या तिघीजणी युद्ध चमत्कार पाहू लागल्या. शत्रूच्या सैन्याशी राजाचे सैन्य जाऊन भिडले. जमा एकाद्याच्या अगात भूतसचार व्हावा त्याप्रमाणे त्या सर्वाच्या अगात वीररसाचा सचार झाला होता. झालें; काय पुढे विचारिता! हाणमार सुरू झाली. जिकडेतिकडे रक्त, छिन्न भिन्न कलेवरें, हाहाकार, सिहनाद व मरण यांचा सुकाळ झाला. उडणारी धूळ रक्ताच्या योगाने खाली बसली, शस्त्रापासून निघालेल्या अग्नीच्या योगाने अधकार क्षणभर नष्ट झाला, युद्धामध्ये गढून गेल्यामुळे वीराचे शब्द फारसे ऐकू येईनातसे झाले, रणागणात देह-त्याग करावयाचा, या निश्चयामुळे मरणाची भीति पळाली; व व्यवस्थितपणे युद्ध सुरू झाले. पण वेगाने मुटणाऱ्या सशब्द बाणान्यायोगानें, एकमेकावर हापटणाऱ्या व त्यामुळे खट खट व खण् खण् असा ध्वनि करणाऱ्या तरवारींच्या योगाने आणि झण् झण् असा शब्द करणाऱ्या महास्त्राच्या योगानें तें दुःसह दुष्प्रेक्ष्य व दुस्तर वाटत होते १६ सर्ग ४७-या सर्गात सिंधुराजास जय मिळण्याचे कारण सागून सूर्योदयानंतरही युद्ध चाललें व मंत्रयुक्त अस्त्रांनी दोन्ही राजानी द्वैरथ युद्ध केले, असे ___ वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, अशारीतीनें तें घोर युद्ध चालले असता राज वाड्यातून युद्धप्रसंग पहाणान्या त्या दोघी लीला देवीस झणाल्या, “ जननि