Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीराम-गुरुराज, त्या देवी विदूरथाच्या गृहांत, असे भाषण करीत असताना रागावून तेथून निघून गेलेल्या त्या राजाने पुढे काय केलें ? श्रीवसिष्ट्र--रामा, विदूरथ आपल्या सर्व परिवारासह त्या राजगृहातून एकाएकी निघाला. त्यावेळी तो नक्षत्रयुक्त निशापतीप्रमाणे दिमत होता. त्याने अगात कवच घालून आपली सर्व शस्त्रास्त्रे आपल्या जवळ घेतली. तो जेव्हा त्या भव्य गृहातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या लोकांनी मोठ्या धैर्याने त्याचा जय-जयकार केला. योद्धयास पुढे काय करावयाचे ते सागून व मत्र्यानी व्यूहादिकाची रचना कशी काय केली आहे आणि नगरावामी जनाची व्यवस्था कशी करण्याचा त्याचा विचार आहे, हे समजून घेऊन तो वीरश्रीने भरलेला राजा आपल्या अलकृत रथावर चढला. त्याच्यावर पाच पताका फडफडत होत्या. सर्व शस्त्रास्त्रे होती. वान्यासारखे वेगाने चालणारे आट घोडे त्यास जोडिले होते. मातलीसारिखा कुशल सारथि त्याच्या अग्रभागी बसला होता. चागल्या सस्कारानी युक्त असलेला बुद्धि- सारथि जसा इद्रियरूपी अश्वाचे मनोरूपी प्रग्रह ( लगाम ) आपल्या अधीन ठेवितो व त्या इद्रियाश्वास आपल्या इच्छेप्रमाणे, मन -प्रग्रहास ओढून किवा सैल सोडून, सन्मार्गानेच जाऊ देतो त्याप्रमाणे त्या सारथ्या- नेही घोड्याचे प्रग्रह ( लगाम ) आपल्या हातात धरिले होते व त्यास इष्ट मागोनेच चालविण्यास तो सज्ज होऊन राहिला होता. शरीररूपी स्थात बसलेल्या जीवरूपी रथीने बुद्धिसारथ्यास सस्कारद्वारा प्रेरणा केली असता जसा शरीररथ चालू लागतो ( ह्मणजे चेष्टा-हालचाल करितो,) त्याप्रमाणे रथी विदूरथाने त्या सारथ्यास प्रेरणा केली असता तो रथ शत्रुसैन्यावर चालून जाऊ लागला. त्याबरोबर रथास लाविलेल्या शेकडो क्षुद्र घटाचा मजुळ ध्वनि होऊ लागला. अश्वानी आपल्या खेखाळण्याने भापल्या सजातीयास जणु काय प्रोत्साहन दिलें. रणवाद्याचा गजर सुरू झाला. सैनिक सिंहनाद करू लागले. धनुष्याचे टणत्कार होऊ लागले. बाणाचे सू-सण्णण असे ध्वनी ऐकू येऊ लागले. राजा शत्रूशी युद्ध करण्याकरिता निघाला, असे समजताच पूर्वी परत फिरलेले वीरही पुनरपि नव्या उत्साहाने सैन्यास येऊन मिळाले. योद्धयांची मोठी गर्दी झाली. त्यांची कठिण कवचे व शस्त्रे एकमेकांच्या कव- चास व शस्त्रास लागून त्यांचा खण-खण ध्वनि होऊ लगला.