पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४६. २७५ स्थूलशरीरानें भर्तृ-लोकाची प्राप्ति झाली. पण मला मात्र दुसऱ्या शरीराने येथे यावे लागले. हे मनात येतांच तिला फार वाईट वाटले व ती देवीस सणाली, " देवि, जे तुझ्यासारखे सत्यकाम, सत्यसकल्प व ब्रह्मस्वरूपी असतात त्याचे इष्ट तात्काल सिद्ध होत असते, असे असतांना माते, तू मला त्याच माझ्या शरीराने या लोकांतरांत व त्या गिरिपामांत का आणिलें नाहींस ? " लीलेचा हा प्रश्न ऐकून देवी झणाली, " सुंदरि, मी कोणाचे काही करीत नाही. जीव आपलें इष्ट स्वय सपादन करीत असतो. मी केवल त्याचे पुढे होणारे कल्याण अगोदर वरदानाने प्रका- शित करितें. इष्ट फल उत्पन्न करणारी प्रत्येक प्राण्याची प्राक्तन काम-कर्म- वासनावछिन्न चिद्रूप जीवशक्ति ( त्या त्या कार्याच्या बीजरूप मायायुक्त चिच्छक्ति ) असते. त्या शक्तीप्रमाणे मी फल देते. माझ्या पदरचें मी काही देत नाही. माझी आराधना करणाऱ्या तुला ' मी मुक्त व्हावे ' अशी इच्छा होऊन दीर्घकाल चिंतनाने तीच दृढ झाली. ह्मणून मला तुझ्या भावनेप्रमाणे निरनिराळ्या युक्तया योजून तुला बोध करावा लागला. आता तू निर्मल भावास प्राप्त झाली आहेस. तुझे अज्ञानावरण क्षीण होऊन आता तुझे स्वरूप स्वाभाविक शुद्धीने सपन्न झाले आहे. जशी भावना तसें फल. जशी आपली बीजभूत चितिशक्ति तसें कार्य. लीले, हा अबाधित नियम आहे. त्यामुळे ज्या ज्या प्राण्याची दीर्घ अभ्यासाने जी जी भावना दृढ झाली असेल त्या त्याप्रमाणे त्याला योग्य काली फल मिळते. आपली चितिच तपोरूप किंवा देवतारूप होऊन दीर्घ व दृढ सकल्पाप्रमाणे अकस्मात् फल देते. तात्पर्य प्राण्याच्या सवित्- पुरुषार्थावाचून दुसरे कोणीही फल देणारे नाही. यास्तव ज्याला ज्या फलाची इच्छा असेल त्याने तसा सवित्-प्रयत्न (भावना, संकल्प) व कर्म करावें. लीले, चित्सत्ताच सृष्टीमध्ये अतरात्मा होऊन पूर्वी जसे विहित किंवा निषिद्ध करिते त्याप्रमाणे तिला पुढे फलानुभव घ्यावा लागतो. ह्या परम सिद्धांताचा विचार करून परम पावन पदास ओळख व अतःकरणात तद्रूप होऊन रहा ४१. सर्ग५६-या सात-आपल्या सर्व सैन्यासह विदूरथ रणभूमीत जाऊन शत्रूश लहू लागला-असे सागतात.