पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ बृहद्योगवासिष्ठसार. भासत आहे. याच रीतीने सर्वत्र सर्वगामी संवित्-आदर्शामध्ये ( म. ज्ञानरूपी आरशांत ) प्रतिभा प्रतिबिंबित होते. ती जेथे जशी असते तशीच तेथें निरंतर उदय पावते. जीवाकाशाच्या आंत असलेली जी अतर्यामी-ईश्वराची प्रतिभा ती स्वतः बाह्य वस्तु निर्माण करिते व त्यामुळे बाह्य पदार्थ सर्वसाधारण होतात. साराश, वत्से, हे आकाश, त्यातील हे भुवन, त्या भुवनांतील ही पृथ्वी, त्या पृथ्वीत असलेली तु, मी, हा राजा, इत्यादि सर्व चिन्मात्ररूप आहे. दुसरे तत्त्वज्ञ असेंच समनतात. यास्तव तूंही तसेच समजून स्वस्थ व विक्षेपरहित हो ४४. सर्ग ४५.-या सर्गात दुसऱ्या लीलेस देवीने. दिलेला वर, तिला होणारी पद्म- राजाची प्राप्ति व स्वसकल्पानुसार जीवास फललाभ होतो, हा परम सिद्धांत, यांचे वर्णन करितात. श्रीसरस्वती-लीले, हा विदूरथ आतां या रणांगणांत शरीरत्याग करून त्या तुझ्या अतःपुरात जाईल व पद्मराजा होईल. श्रीवसित-राघवा, देवीचे हे भाषण ऐकून त्या नगरातील लीला (म. विदूरथाची पट्टराणी ) हात जोडून व अति नम्र होऊन देवीस ह्मणाली, " हे देवशि, मी भगवती ज्ञप्ति-देवीची सतत पूजा करीत असते. ती दयाळु देवी मला स्वप्नामध्ये दर्शन देते. पण त्या माझ्या इष्ट व पूज्य देवीसारखीच तू मला अगदी हुबेहूब दिसतेस. यास्तव मला वाटते की मज दीनावर प्रसन्न होऊन मला कृतार्थ करण्या- करिताच तू येथे आली आहेस. जननि, मला वर दे. " रामा, तिचे हे मधुर भाषण ऐकून देवीस फार आनद झाला व तिची परम भाक्त पाहून ती ह्मणाली, " बाळे, तुझ्या अनन्य व अविच्छिन्न दीर्घ भक्तीनें मी प्रसन्न झाले आहे. यास्तव तुला जो वर इष्ट असेल तो माग." देवीचे हे कृपापूर्ण भाषण ऐकून ती दुसरी लीला ह्मणाली, " रणात देहत्याग केल्यावर माझा पति जेथे जाऊन राहील तेथे याच शरीराने मी त्याची पत्नी होईन, असा मला वर दे " ते ऐकून देवी ह्मणाली, “ बरे आहे तू माझी दीर्घकाल अनन्यभक्तीने, सर्व-उपचार समर्पण करून, पूज केली आहेस, यास्तव तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. " ज्ञप्तीच्या मुखकम लातून निघालेले हे शब्द ऐकतांच त्या लीलेचे मुख आनंदाने प्रफुल्लिर झाले. पण इकडे त्या पूर्व लीलेच्या मनात मोठा विकल्प आला. हिल