पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १४. २७३ निर्णय करिता येत नाही. ह्मणजेच तें अनिर्वचनीय आहे. कारण भ्रातीमुळे ज्याचा अनुभव येतो त्यास सत्य ह्मणता येत नाही व वस्तुतत्त्व-परीक्षणात्मक बाधक-ज्ञान सत्याचा अपलाप करू शकत नाही. (ह्मणजे आरोपित वस्तु मिथ्या आहे, असे ज्ञान झाले असता ती वस्तु जरी बाधित होत असली तरी त्या ज्ञानामुळे अधिष्ठान असत्य ठरत नाही.) परम कारण ब्रह्मच मायापिहित झाल्यामुळे चित्त्वास अथवा जीवत्वास प्राप्त होते व दीर्घ अभ्यासामुळे ते आपणासच स्पष्टपणे जीव समजते. जीवाची भोगेच्छाच ससाराचे कारण आहे. त्यामुळे जग सन्य असले तरी व असत्य असले तरी जीव स्वेच्छेने त्यास भोग्य बनवितो. जीव पूर्वानुभवामुळे काही पदार्थ पहातो (ह्मणजे काही वस्तु त्यास पूर्वी अनुभव घेतलेल्या वस्तूसारख्या दिसतात) व काही अगदी अपूर्व पहातो. किन्येक पदार्थ तर त्यास थोडे अनुभविलेले व थोडे न अनुभविलेले अशा स्वरूपाचे दिसतात. तात्पर्य वासनेप्रमाणे जीवाकाशामध्ये असत्य अनुभव सत्य असल्यासारखे दिसतात. तेच कुल, तेच आचार, तेच जन्म, तेच व्यवहार, तेच मत्री व तेच नगरवासी जन अनुभवास येतात. पण अधिष्ठानाच्या दृष्टीने पाहिल्यास परमार्थतः ते पूर्वीच्याहून भिन्न नसतात व आरोपित दृश्याच्या दृष्टीने पाहिल्यास ते त्याच्या सारिखे असतात. (सर्वत्र अशीच चैतन्याची स्थिति आहे, असें आतां देवी सागते-) लीले, मर्वगामी आत्मस्वरूप प्रतिभेची ही अशीच स्थिति आहे. ( यावर कोणी ह्मणेल की, ईश्वर आपल्या प्रतिभेप्रमाणे पदार्थास निर्माण करिता व जीवाची प्रतिभा ईश्वरनिर्मित पदार्थ जसा असेल तशी उद्भवते, अमे शास्त्रांत सागितले आहे व ते बरोबरही दिसते. कारण तसे न मानिल्यास सकल्पाने कल्पिलेला पदार्थही सत्य व सर्वप्राणि-साधारण होऊ लागेल. पण तसा अनुभव येत नाही तेव्हा केवल राजाच्या प्रतिभेने पदार्थाची सिद्धि कशी झाली व इतर जीवाच्या साधारण व्यवहारास ते पात्र कम झाले ? यास्तव देवी ह्मणते-) राजाच्या आत्म्यामध्ये जशा प्रकारची सन्मयी व सर्वसाधारण प्रतिभा उत्पन्न होते तशीच भोक्त्याच्या अदृष्ट- वशात् मत्सज्ञक आकाशात (ह. अव्याकृताकाशरूप ईश्वरामध्ये ) सत्यसकल्परूप प्रतिभा उत्पन्न होते. (त्यामुळे वरील दोष येत नाहीत.) या नियमाप्रमाणेच ही प्रतिभा--प्रतिबिंबापासून उत्पन्न झालेली लीला