पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७२ बृहद्योगवासिष्ठसार. पक्षास निरोध करिते. ब्रह्माच्या ठिकाणी सर्व विकल्प 'सभवतात. पण नुसत्या जगाविषयी ते सत्य आहे, की असत्य आहे, की सत्यासत्यरूप आहे याचा निर्णय करिता येत नाही. ब्रह्म आकाश, द्रव्य-गुणादि पदार्थाचे परमाणु इत्यादि सर्व लहान-मोठ्या वस्तूत ( अगदी अतर्भागी ) राहू शकते. पण जग तसे राहू शकत नाही. जेथे जेथे जीवसज्ञक अणु- चिद्रूप असते तेथे तेथे जगाचे अस्तित्व भासते. ( वासना ही एक मोठी चमत्कारिक शाक्त आहे. तिच्या बलाने आत्म्याचे ठायीं अनात्म्याचा कसा अध्यास होतो याविषयी देवी एक दृष्टान देते-) पूर्वी अग्नि नसलेला उपासक मी अग्नि आहे, अशी दीर्घकाल उपासना करून भावना-बलाने अग्निरूप होतो व त्यावेळी त्याला आपल्या उष्णतेचा साक्षात्कार होतो त्याचप्रमाणे आत्मा दृढ व दीर्घ अभ्यासामुळे स्वत.च्या शुद्धचैतन्यावर जगाचा आरोप करितो व त्याच्या अनात्मरूपाचा व जाड्य, दु ख इत्यादि दोपाचा अनुभव घेतो सूर्योदय होऊन घगत किरणे पडली असतः त्यातन जसे अनेक त्रसरेणु फिरत असलेले दिसतात त्याप्रमाणे परमाकाशात हे ब्रह्माडरूपी त्रसरेणुच फिरत आहेत, असे त जाण. वायूमध्ये जसा वास व स्पद रहातो अथवा आका- शात शून्यत्व रहाते त्याप्रमाणे परात्पर तत्त्वामध्ये, ज्याने आपला स्थूलभाव सोडिला आहे, असे जग रहाते. आविर्भाव-तिरोभाव, ग्रहण-त्याग, स्थूल-सूक्ष्म, चर-अचर, इत्यादि अशाप्रकारचे हे सर्व काल्पत भाव अवयवरहित ब्रह्माचे काल्पत भाग जाहेत, असे समज. पण साकार जगाचे निराकारत्व समजून देण्याकरिता त्याची कल्पना केलेली असून वस्तुतः ते स्वात्मभूत ब्रह्माहून अनन्य, ( अभिन्न, नि- राळे नसलेले ) आहेत, हेही तुला विसरता कामा नये जगाच्या सावयवत्वाप्रमाणे निरवयवत्वही मिथ्या आहे येणेप्रमाणे ब्रह्माच्या ठायी अनन्य होऊन राहिलेले जग, विश्व असे त्या(ब्रह्मा)चे नाव व सर्व, पूर्ण इत्यादि त्याचा अर्थ या दोहोनीही रहित नसते. (ह्मणजे ज्ञानानतर ब्रह्मरूप झालेल्या जगासच विश्व हे नाव बरोबर लागू पडते. ) असें जर आहे तर या भासणाऱ्या सावयव जगाची वाट काय करावयाची? ते असें का भासतें: ह्मणून विचारशील तर सागते. लीले, जरी ते भासले तरी रज्जुसर्पभ्रमाप्रमाणे, ते सत्य आहे की, असत्य आहे, याचा