पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७. बृहद्योगवासिष्ठसार. भास चितिशक्तीमुळे न होता खरोखर पदार्थामुळेच जर झाला असता तर त्यास योग्य देश योग्य काल इत्यादिकांची आवश्यकता असती. पण वस्तुस्थिति तशी नसल्यामुळे योग्य देशादिकांवाचूनच हे सर्व भास होऊ शकतात. स्वप्नात भासणाऱ्या पदार्थाप्रमाणे, चैतन्याचे ठायीं अध्यस्त असल्यामुळे वस्तुतः आंत असलेलें जग, बाहेर असल्यासारखे भासते. पण आत अगदी सूक्ष्म नाडीमध्ये असलेलेही ते, दीर्घ अभ्यासामुळे, बाहेर व्यक्त व सत्य असल्यासारिखे होऊन राहिले आहे. त्या तुझ्या नगरामध्ये तुझा भर्ता जशा तन्हेच्या वासनेने युक्त होऊन मरण पावला त्या वासनेप्रमाणे त्या त्या वस्तु त्यास तेथेच प्राप्त झाल्या. पण समान कर्मवासनेमुळे उद्बोधित झाल्याकारणाने येथील मंत्र्यादिकाचे आकार जरी त्याच्या आकारासारखे असले तरी त्याचे जीव तेच नाहीत, तर ते निराळे आहेत. तेच हे आहेत असा तुला जरी वारवार अनुभव आला तरी ते हे नव्हेत. तर त्याच्यासारखे, न्याच्या आकाराचे आहेत एवढेच काय ते. स्वप्नांतील साकल्पिक सैन्याप्रमाणे या राजाच्या चित्सत्तेमुळे ते तद्रूप झाले आहेत. स्वप्न व जाग्रत् यातील पदार्थामध्ये जर काही अतर असेल तर ते हेच की, स्वप्नातील पदार्थ स्वप्न- द्रष्टयावाचून दुसन्या कोणाच्या अनुभवास येत नाहीत व जागृतीतील पदार्थ जसेच्या तसेच सवाच्या अनुभवास येतात. पण तेवढ्यावरून त्यास सत्य कसे ह्मणता येईल ? कारण चद्रही सर्वास एकसारिखाच टी- चभर व भाकरीसारिखा गोल दिसतो; गारुड्याने बनविलेला मातीचा रुपायाही सर्वांस एकसारिखा दिसतो; आकाशाचे नीलत्वही आबाल-वृद्धास दिसते. स्मातील पदार्थ उठताक्षणीं बाधित होतात (मिथ्या ठरतात ) ह्मणून ह्मणावें तर जाप्रतीतील पदार्थही जाग्रदवस्था सोडताच मिथ्या ठरतात. ह्मणजे हे सर्वच अशाप्रकारचे आहे ! मग जाग्रत्पदार्थातच अशी कोणती अधिकता आहे की, जिच्याकरिता ते स्वाप्न पदार्थाहून विलक्षण आहेत, असे ह्मणता येईल ? जाग्रतीत स्वप्न मिथ्या ठरते व स्वप्नात जाग्रत् मिथ्या ठरते, हे सर्वास ठाऊक आहे. त्याचप्रमाणे जन्म झाला असता मरण असत् ठरते व मरणसमयी जन्म असत् ठरतो. आता नाश व बाध यामध्ये जो काही थोडासा विशेष आहे तो एवढाच की, नाशप्रसगी, अवयव विनाशी असल्याकारणाने त्यानीं बन-