पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ बृहद्योगवासिष्ठसार. नावरील सकट झणजे दुर्जनाचा उत्सवच होय. लोक अशा घोर प्रस- गात गुतले आहेत, असे पाहून कित्येक शठ सज्जनाचा वेष घेऊन व त्या दुःखितास आपत्तीतून सोडविण्याचे मिप करून त्याची धन-धान्यादि सपत्ति सापडेल तितकी लाबवीत होते. एवढ्या निराशेच्या प्रसगीही नगरातील राजाचे कृतज्ञ वीर आपल्या व शत्रूच्या रक्ताचे सडे, नगर- भूदेवीस तृप्त करण्याकरिता, घालीत होते असो, शेवटी तो कहर राज- वाड्यापर्यत आला व राजगृहात चोहोकडे हाहाकार उडाला ४३. सर्ग ४४-आपली पट्टराणी भ्याली आहे व अत पुरवर्गास शत्रूनी पीटिले आहे, असे पाहन राजा युद्धाकरिता बाहेर पडला, असे सागून या सर्गात लीलेचे तत्त्व वर्णिले आहे श्रीपसिष्ट-रामा, इतक्यात रासाची तरुण महिषी (अभिषिक्त रानी) लक्ष्मीप्रमाणे त्या स्थानी आली. तिची वस्त्रे. केस, माळा व अलकार अस्ताव्यस्त झाले होते. भीतीने तिची बोबडी वळली होती. श्रमाने सर्वागास घाम आला होता. तिच्या आवडत्या दासी तिच्या मागोमाग येत होत्या तिचे मग्व चद्रासारखे असून भीतीमुळे ओष्टपुट थरथर कापत होते काळेभोर नेत्र अश्रमळे अधिकच पाणीदार दिसत होते. नाकपुड्या लाल झाल्या होत्या व श्वास लागल्यामुळे उर स्थळ वेगाने हालत होते. आपल्या प्रिय पत्नीची अशी पूर्वी कधी न पाहिलेली अवस्था पाहून राजाच्या चित्तात एकाच वेळी अनेक विकार उत्पन्न झाले. इत- क्यात तिच्या दासीतील एक शहाणी व बोलकी दासी पुढे होऊन व नम्रपणे हात जोडून त्या आपल्या स्वामीस ह्मणाली-राजन् , या आ- मच्या देवीसह आम्ही अतःपुरातून येथे पळून आलो आहो. वायूच्या सोसाट्याने व्याकुळ झालेली वेल जशी आपल्या आश्रयभूत वृक्षाजवळ येऊन सुरक्षित होऊन रहाते त्याप्रमाणे ही आमची देवी आता निर्भय होईल, यात काही सशय नाही. पण, प्रजानाथ, मी आपल्यास काय सागू? शत्रूच्या सशस्त्र, बलाढ्य व दुष्ट लोकानी अतःपुरातील आपल्या इतर भोग्य स्त्रियास बलात्काराने हरण करून नेले आहे. क्षुब्ध समुद्राच्या लाटा तीरावरील वृक्षाचा व वेलीचा जसा विध्वस करितात त्याप्रमाणे त्या उद्घटानी अत पुरातील रक्षक पुरुषाचा व स्त्रियाचा चूर उडविला आहे. एकाएकी आलेल्या वावटळीने जसे उत्तम उत्तम वृक्षाचे उन्मूलन करावे