पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४३. २६७ राचीही आहुति देण्याकरितां पुनः जळत्या गृहात मुद्दाम शिरत होते. काही अबला "अहो या प्रखर अग्नीत माझी माता, पिता, पति, पुत्र, कन्या, जामाता इत्यादि जळून भस्म झाली; आता मी काय करू व कोठे जाऊ ?" असे म्हणत व आक्रोश करीत स्त्रियाचे जीवित किती पराव- लबी आहे, हे व्यक्त करीत होत्या. धन, धान्य, वस्त्र, पात्र इत्यादि सर्वो- चीच एकसारखी होळी होऊ लागल्या कारणाने जग किती अनित्य आहे, आकार किती क्षणभगुर आहे, सपत्ति कशी विपत्तीचे मूळ आहे आशा कशी भयकर आहे, सग्रह कसा अनर्थावह आहे व काल कसा निर्दय आहे हे सुज्ञाच्या ध्यानात सहज आले. त्या नगरात जे बरेचसे सच्छील, पार्मिक, विचारी व सात्त्विक भागवत जन होते त्याचीही इतराप्रमाणेच दैना होत असलेली पाहून प्रारब्ध कर्म दुर्लध्य आहे, ते ऐहिक (वर्त- मान) सदाचरणादिकाच्या योगाने हटणे शक्य नाही, असे कोणाच्याही ध्यानात तेव्हाच येत असे. धुराच्या भयकर लोटामुळे अतरिक्षात विमा- नातून जात असलेले सिद्धादि खे-चरही अविवेक्याप्रमाणे अध व व्याकुळ झाले असावेत, असे अनुमान होत असे. शरीरावरील वस्त्रास अग्नि लागल्यामुळे 'देह हाच मी' असे समजणारे स्त्री-पुरुष अगावरील वस्त्रे टाकून देऊन कामातुगप्रमाणे निर्लज्ज होत असल्याचे त्याच्या दृष्टोत्पत्तीस आले. कोणाचे लाब केस भुरभुर जळत आहेत, कोणाची दाढी पेट घेत आहे, कोणाची वेणी धुमसत आहे, कोणाचे अग पोळत आहे, कोणाचे हातपाय पेटू लागले आहेत, कोणी असह्य यातना सहन न झाल्याकारणाने 'हाय हाय, मेलोरे मेलों, अरे मला कोणी सोडवा' इत्यादि ओरडत व अस्ताव्यस्त नाचत आहेत, कोणी आपल्या देवाला दोष देत आहे तर कोणी राजास शिव्या देत आहेत, कोणी नगररक्षकाची व सैन्यातील शूराची निंदा करीत आहे तर कोणी शत्रूच्या लोकास शापीत आहेत; इत्यादि अनेक प्रकार तेथे चालले होते. इतक्यात नगराच्या बाहेरचे लोक राजाच्या सैन्याचा पराभव करून नगरात शिरले. त्यानी अगोदरच नरकयातना भोगीत असलेल्या लोकावर अनेक अत्याचार केले. यमदूताचे कर्म प्रत्यक्ष करून दाखविले. स्त्रियावर बलात्कार केले. संपत्ति लुटली. बाल व वृद्ध याचे हाल हाल केले आणि नगराचा अवशिष्ट भागही उद्धस्त करून टाकिला. रामा, सज-