पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ बृहद्योगवासिष्ठसार. (गुड गुड ध्वनि ) जळणान्या लांकडाचा व वेळूचा चटचटाकार, नगरात जळणाऱ्या बाल, वृद्ध व स्त्रिया यांचा हाहाकार, अतरिक्षात उडणारी किटाळे आणि सर्व शहरास सतप्त करणाऱ्या धक् धक् ध्वनि- युक्त ज्वाला याच्या योगाने राजास व त्या दोघी देवीस नगरातील संक- टाचे व लोकावरील अरिष्टाचे यथार्थ ज्ञान झाले. तो भयकर प्रसग स्वतः पहावा या हेतूने त्या देवी, राजा विदूरथ व मंत्री खिडक्यापाशी गेले. तेव्हा नगरातील कल्पात त्याच्या प्रत्यक्ष दृष्टी पडला. त्यावेळी तेथे चाल- लेल्या दुर्धर अतिप्रसगाचे कोठवर वर्णन करावे. प्रलयसमयी प्राणिसमूहाची काय अवस्था होत असेल याची कल्पना त्यास चागली झाली. राजगृहाच्या त्या उच खिडक्यातून नगरातील व नगराबाहेरील सर्व प्रकार स्पष्ट दिसत हाता. शत्रूचे यमस्वरूपी वीर शहरात घुसण्याचा प्रयत्न करीत होते व नगरातील सैनिक तटावर स्थिर राहून व नगराच्या बाहेर पडूनही त्यास मागे हटवीत होते. त्याच्या शस्त्रास्त्राचे प्रहार, त्यानी अगोदरच तृणतुल्य मानिलेल्या त्याच्या स्थूल भौतिक पिडास छिन्न भिन्न करून, त्यांना त्या ऐहिक दुर्गतीतून सोडवीत होते द्रव्याच्या, मानाच्या व कीर्तीच्या लोभाने किवा दुरभिमानाने आपले शरीर ज्यानी आपल्या स्वामीस विकले आहे, असे ते योद्धे मनुष्याकार असतानाही राक्षसी आचरण करून स्थूल आकार व सूक्ष्म भाव याचे प्राय ऐक्य नसते, असे विचारी पुरुषाच्या मनात भरवीत होते इकडे नगरात अग्नीच्या मुखात पडलेले आबाल-वृद्ध, सकटावाचून ईश्वराचे स्मरण होत नाही, यास्तव ईश्वरा आझावर अशीच घोर सकटे आणून अनुप्रह कर. ह्मणजे आह्मी आतुर होऊन एकाद्या परम भक्ताप्रमाणे तुझे स्मरण करू, असे सुचवीतच जणु काय " हाय, हाय, अरे देवा, भवसागराप्रमाणे या सकट-सागरात बुडत असलेल्या आम्हास यातून सोडीव " असे ओरडून दयाल सात्त्विकाच्या चित्तास पाझर फोडीत होते. परोपकारी व साहसी पुरुषानी, स्वशरीराकडे न पहाता, जळक्या घरात शिरून, पाशातून सोडविलेले पशु व पक्षी-सुखमय ससारासही अनेक दुर्भा- वनाच्या योगाने दुःखमय करून सोडणाऱ्या मनुष्याच्या सहवासाचे हे फळ आहे, असे सर्वास कळविण्याकरिताच जणुकाय दीन स्वराने आक्रोश करून- सैरा वैरा धावत होते. प्रेमामुळे दृढ बद्ध झालेला कामी पुरुष पटलेल्या गृहातून आपली प्रिया बाहेर येणे शक्य नाही, असे पाहून आपल्या शरी-