पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ बृहद्योगवासिष्ठसार. भ्रम होतो, असे नाहीका ठरत ? स्वप्नामध्येही भारास वारवार तीच पृथिवी, तेच आकाश, तीच आमची जाति, तेच नाव इत्यादि प्रत्यक्ष भासते. तेव्हा एका दिवसाच्या जाग्रतीतील पदार्थ दुसऱ्या दिवसाच्या जाप्रतीत न भासणे व एका स्वप्नातील पदार्थ दुसऱ्या स्वप्नात न भासणे या दृष्टीने पाहिले तरी जाग्रत् व स्वप्न याचे साम्यच ठरते. यास्तव तुला जी जाप्रत्-अवस्था वाटत आहे ती स्वप्नतुल्य आहे, असेच तू निःशक- पणे समज आता तू कदाचित् ह्मणशील की, स्वप्नातील पदार्थ जर सत्य आहेत तर ते जाग्रतींत का दिसत नाहीत ? तर त्यावर मी तुला उलट असे विचारितो-स्वप्नातील पदार्थ जाग्रतीत दिसत नाहीत ह्मणूनच जर त्यास मिथ्या समजावयाचे असले तर जाग्रतीतील पदार्थ स्वप्नात दिसत नाहीत, ह्मणून त्याच न्यायाने, तेही मिथ्या नाही का ठरत ' तात्पर्य अधि- ष्ठानाच्या सत्तेने ते दोन्ही प्रपच सत्य असून स्वतः दोन्ही असत्य आहेत. पण असत्य असले तरी ते दोघेही प्राण्यास एकसारखाच मोह पाडित असतात. सवित् सर्व देश, सर्व काल व सर्व अवस्थामध्ये राहते. ह्मणजे माळेतील दोऱ्याप्रमाणे तिची सर्वत्र अनुवृत्ति होते. ह्मणूनच ती सत्य आहे व देश, काल आणि अवस्था मालेतील मण्याप्रमाणे सर्वत्र अनुवृत्त नसतात तर त्याची सदा व्यावृत्ति होत असते. यास्तव ते मर्व मिथ्या आहेत. चिदाकाशात चैतन्याच्या प्रभावाने हे सर्व दिसते. चैतन्याचाच हा सर्व विवर्त आहे. चैतन्याच्या आधारानेच या सर्वाची स्थिति होते. यास्तव एक चैतन्यच कायते सत्य आहे. असो, रामा, लीलेचे समाधान व्हावे ह्मणून ज्ञप्ति देवीने याप्रमाणे विदूरथास उपदेशामृताने तृप्त करून “स्वस्त्यस्तु" असा आशीर्वाद दिलाव हटले-राजा, जग मिथ्या कसे हे चागले समजावे ह्मणून दृष्टाताचा अनु- भव घेण्याकरिता आझी या मडपातील तुझ्या ब्रह्माड कल्पनेत आलो होतो. आमचे कार्य आता झाले आहे. यास्तव आह्मी आता परत जातो. रामा, देवीचे हे मधुर वचन ऐकून तो बुद्धिमान् विदूरथ राजा ह्मणाला, “ देवि, मला तुझे हे अचित्य दर्शन झाल्यामुळे मी आज धन्य झालों आहे. महात्म्याचे दर्शन कधीही निष्फळ होत नसते. एका स्वप्नातून जर्स दुसन्या स्वप्नात जावे त्याप्रमाणे मी आता लवकरच हा देह सोडून निजधामास येईन. या दीनाकडे कृपादृष्टीने पहा. मी तुला शरण आलों