पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४२. २६३ अनुभवास येत असतात, हे सर्वास ठाऊक आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये कोणाची तरी सत्य सत्ता असलीच पाहिजे. यांत काही संशय नाही.) शिवाय स्वाप्न पदार्थास अत्यत असत् समजल्यास जाग्रतींतील प्रपचासही अत्यत असत् ह्मणण्याचा प्रसग येणार. कारण तोही हिरण्यगर्भाचे स्वप्नच आहे. तस्मात् वर झटल्याप्रमाणे जग व स्वप्न याचे साम्य व त्याची अभियानदृष्टया सत्यता, ही सिद्ध झाली आणि या विपुल ससारात मी जसा तुला सत्य भासतो तसाच तूही मला सत्य भासतोस. श्रीराम-- महाराज, असे जर आहे तर स्वप्न पाहाणारा पुरुप जागा झाल्यावरही त्याने पाहिलेला स्वाप्न प्रपच, जाग्रत्प्रपचाप्रमाणे, जशाचा तसाच राहील, असे मला वाटते. श्रीवसिष्ठ-होय. तू ह्मणतोस ते खरे आहे. स्वप्नद्रष्टा जरी जागा झाला तरी त्याने पाहिलेला स्वाप्न प्रपच अधिष्ठान-सन्मात्र-स्वभाव अस- ल्यामुळे सत्य आहे. श्रीराम-पण जाग्रत्प्रपच जसा जन्मभर दिसतो तसा स्वानप्रपंच दिसत नाही एका स्वप्नातील वस्तु दुसऱ्या स्वप्नात कधीच कोणाच्या अनुभवास येत नाही. श्रीवसिष्ठ--जाग्रतीत तरी तोच पदार्थ व तोच काल याचा अनुभव जन्मभर कोठे येतो ? प्रतिपदेस पाहिलेली वस्तूच द्वितीयेस दिसते, असे आपण ह्मणतो खरे, पण त्या क्षणोक्षणी परिणाम पावणाऱ्या वस्तृत के- वढा फरक पडलेला असतो, हे सूक्ष्म विचारावाचून समजणे शक्य नाही. त्याचप्रमाणे कालचा काल आज नसतो व आजचा उद्या नसतो, हेही विसरता कामा नये. आता आकारासारिखा आकार दिसतो व वारवार पहात राहिल्याने वस्तूमध्ये प्रत्येक क्षणी होत असलेला सूक्ष्म परिणाम दृष्टोत्पत्तीस येत नाही. त्यामुळे ' तोच हा' असा आह्मास भ्रम होतो. पण पाच वर्षा- पासून आपल्यास सोडून दूर गेलेल्या पोटच्या लेकरास, वीस वर्षानी, त्याच्या प्रत्यक्ष जननीने जरी पाहिले तरी तिला तोच हा माझा प्रिय बाळक, असे पाहताक्षणी ओळखता येत नाही. यावरून काय सिद्ध होते बरे ? प्रत्येक क्षणी आपण निरनिराळा पदार्थच पहातो. पण दृढ भ्रम-परिचयामुळे तोच पदार्थ मी जन्मभर पहात आहे, असा आपणास