पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६२ बृहयोगवासिष्ठसार. ज्या ज्या वासना उद्भवतात त्या त्या सर्व चैतन्याच्या बलानेच सत्य आहेत, असे वाटते. चैतन्याने त्या त्या विषयाच्या आकारचे होणे हाच त्याचा विवर्त होय. पण तें पुरुषरूप होऊन हा पुरुष आहे, असे ज्ञान होणे व तो ज्ञात पुरुष सत्य आहे, असे वाटणे या दोन्ही ज्ञानाचे कारण तादात्म्याध्यास व संसाध्यास आहे." ( तादात्म्याध्यास ह्मणजे तदेंक्यरूप अध्यास व ससर्गाध्यास ह्मणजे त्याच्या धर्माचा अध्यास, असे येथे थोडक्यात समजावें. चैतन्य व आरोपित पुरुष याचे ऐक्य हा तादात्म्याध्यास असून त्यामुळे पुरुष सत्य आहे इत्यादि हा ससर्गाध्यास आहे.) श्रीराम-मुनिवर्य, देवीच्या या सागण्यावरून मला आलेली शका मी आपणास विचारितो. स्वप्न व जाग्रत् या अवस्थामव्ये अनुभवास येणाऱ्या प्रत्येक पदार्थात अधिष्ठानाचा सत्याश व मायेचा असत्याश असतो व त्यामुळे तो सत्यानृतरूप आहे, असे आपण ह्मणता. पण त्या- विषयी मला काही विचारावयाचे आहे. जाग्रतीत भासणारे पुरुष सत्य नाहीत, असे झटल्यास व्यवहार कसा होतो हे सागता येत नाही व कर्मकाड अप्रमाण होते. यास्तव त्याच्यामध्ये चैतन्याच्या सत्तेमुळे सत्ता येते, असे ह्मणावे लागते. पण केवल मायिक स्वप्नामध्ये भासणारे पुरुष सत्य नसून असत्य आहेत, असे ह्मणण्यास काय प्रत्यवाय आहे ? ( उत्तर मीमासेत भगवान् व्यासानी स्वप्न मायामात्र आहे. कारण त्यातील पदार्थाचे स्वरूप अभिव्यक्त नसते, असे हटले आहे. असो, तात्पर्य जाग्रत्-विषय स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत, असें कसें ह्मणता येईल १) श्रीवसिष्ठ-रामा, स्वप्नात दिसणारे पदार्थ ब्रह्माप्रमाणे वस्तुत सत्य नाहीत, इतकेच ह्मणता येणे शक्य आहे. पण ते अधिष्ठानरहित अस- ल्यामुळे अधिष्ठानाच्या सत्तेनेही सत्तायुक्त नाहीत, असे ह्मणता येत नाही. कारण जाप्रतीतील पदार्थीप्रमाणे स्वाप्न पदार्थही कल्पित असल्यामुळे साधिष्ठान असतात व त्यामुळे तेही अधिष्ठानाच्या सत्तेनें सत्तावान् असतात. याविषयी प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. (ह्मणजे स्वाप्न पदार्थ जर असत् असते तर त्याचे प्रत्यक्ष ज्ञानही झाले नसते. कारण वध्या- पुत्राचे प्रत्यक्षज्ञान कधीच होत नाही. पण स्वप्नातील पदार्थ प्रत्यक्ष