Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

31 21 (1 '३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ४२. २६१ करिता अज्ञ पुरुषांच्या दृष्टीने जग अत्यत-दृढ-सत्य कसे आहे, ते सागते. त्या सर्वव्यापी पदाचा ज्यास बोध झालेला नसतो त्यास हे जग वज्रासा- रखे दृढ आहे, असे भासते. कारण व्यवहारात अर्थवियाकारित्वासच सत्य ह्मणत असतात. (पाणी प्याले असता तहान भागणे, जेवले असता क्षुधानिवृत्ति होणे, एकाद्या गावाकडे गेले असता तेथे पोचून तो पूर्वीप्रमाणे तेथे आहे, असा अनुभव येणे, इत्यादि काही नियमित सफल क्रिया होणे हेच अर्थक्रियाकारित्व होय.) भ्रमिष्टास वेताल मरणापर्यत जसा क्लेश देतो, हरिणास सूर्यकिरणेच जलरूपाने जशी भासतात, स्वप्नातील मिथ्या मरणही जसे दु.खादि अर्थक्रिया करविणारे व ह्मणूनच सत्य वाटते, अविवेक्यास सोन्याचे कडेच जसे मोहित करिते ( झणजे सोन्याकडे त्याचे लक्षही जात नाही), त्याप्रमाणे अनात्मज्ञास जग सत्य भासते. पण ते असत्य आहे अहता इत्यादिकानी युक्त असलेले हे विश्व ह्मणजे एक दीर्घ स्वप्न आहे, असे तू समज. त्यात अनुभवास येणारे सर्व पुरुष लौकिक स्वप्नात दिसणाऱ्या इतर पुरुषाप्रमाणे मिथ्या आहेत यावर तू कदाचित् ह्मणशील की, असे जर आहे तर याजन, प्रतिग्रह, उपदेश इत्यादि अर्थक्रिया करण्यास ते समर्थ कसे होतात ? तर त्याचे कारण सागते. सर्वाचे अधिष्ठान, शात, निरतिशय सत्य, पवित्र, विषयरहित व चिन्मात्रस्वरूप असे परमाकाश पसरलेले आहे. (देवी आता त्याचे मायशबल स्वरूप सागते ) ते सर्वव्यापी, सर्वशक्ति, सर्व व सर्वात्मक असून मायेच्या योगाने जेथे जेथे जशाप्रकारच्या अर्थक्रियेस योग्य होत्साते व्यक्त होते तेथे तेथे तसेच असते. आता जाग्रतीत शास्त्रीय अर्थक्रिया करण्यास योग्य होऊन व्यक्त झालेले रूप स्वप्नात नसते व स्वप्नातील जाप्रतीत नसते, हे खरे, पण त्याच्या विशेष रूपात जरी असा फरक असला तरी सद्रूपात काही विशेष नसतो. स्वप्नात द्रष्टा जशी कल्पना करितो तसे त्यास भासते द्रष्टयाचे चित्स्वरूप स्वप्नाच्या विकाशात ( ह्मणजे अति सुक्ष्म नाडीछिद्रात ) राहून स्वप्नात उद्भवलेल्या चित्त-वासनेप्रमाणे विकार पावल्यासारखे भासते व अधिष्ठानाच्या सत्यतेमुळे अध्यस्त वस्तू व त्यचे वर्म सत्य आहेत, असा अनुभव येतो. तात्पर्य जाग्रत् व स्वप्न या दोन्ही अवस्थात हा पुरुष आहे, हे झाड आहे, ही गाय आहे, इत्यादि प्रकारच्या