पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० बृद्योगवासिष्टसार. जगातच यावेळी आमी असलेले हे गृह भासत आहे. येणेप्रमाणे त्या मडपात असलेलें आकाश, आकाशादिरहित व अत्यत निर्मल ब्रह्मच होय. त्याचप्रमाणे त्या मंडपामध्ये पृथ्वी नाही, नगरे नाहीत, वने नाहीत, पर्वत नाहीत, मेघ नाहीत, नद्या नाहीत व समुद्रही नाहीत. तर चिन्मात्र-पूर्ण ब्रह्मामध्ये मिथ्या गृहातून मिथ्या जन विहार करीत आहेत पण ते एक दुसऱ्याम पाहत नाहीत. विदरथ--देवी, असे जर आहे तर हे माझे प्रधानादि अनुचर कसे आहेत ? सत्य की असत्य । ते स्वप्नातील पदार्थीप्रमाणे मिथ्या आहेत, असे ह्मणार तर ते सभवत नाही. कारण तेही मजप्रमाणेच जीवाने युक्त आहेत. तेव्हा सत्स्वभाव आत्म्यामध्ये भासणारे हे मिथ्या जगातील जीव मिथ्या नसून सत्य आहेत, असे ह्मणावयास नको का? श्रीदेवी-अज्ञदृष्टीचा आश्रय करून, केवल जीवभावास उद्देशून, मजप्रमाणेच ते सत्य आहेत, असे जर तू ह्मणत असशील तर जीव- भावाने तूही सत्य नाहीस. पण तत्त्वदृष्टीचा आश्रय करून अधिष्ठान- चिन्मात्रभावाने पाहिल्यास तेही सत्य आहेत. राजा, तत्त्वज्ञास या जगातील एकही भाव सत् वाटत नाही. तर सद्रूप चिदा- काशात, हे सर्व भाव, जलतरग-न्यायाने भासत आहेत, असे ते समजतात. यास्तव तूही त्याच्या दृष्टीचा आश्रय करून हा भ्रम टाक. एकदा तुझा भ्रम गेला ह्मणजे मी व इतर ज्ञानी काय ह्मणतात, ते तुला चागले समजेल. (असो; श्रीवसिष्ठ देवी व राजा याचा सवाद यथवर सागत आहेत तो, सूर्यास्त झाला. त्यामुळे सभेतील धर्मपरायण लोक पूज्य मुनींस नमस्कार करून स्नानसंध्यादि नित्य कृत्ये करण्या- करिता अभीष्टस्थानी गेले व दुसऱ्या दिवशी प्रात.कालचे नित्यकर्म धाटोपून पुनरपि सभेत येऊन बसले. येथे पाचवा दिवस समाप्त झाला) ४१. सर्ग ४२-अज्ञानावस्थेत जग व स्वप्न या दोघासही सत्यत्व आहे. असे येथे __ अगोदर सागून शेवटीं वरप्रार्थनेपर्यंत कथाभाग वर्णिला आहे. श्रीवसिष्ठ-रामा, नंतर देवी मणाली, “ विद्वानाच्या दृष्टीने जग असत्य आहे, हे मी तुला एवढावेळ सांगितले. आता तेच दृढ करण्या-