पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४१. २५९ देवीने मला पूर्वजन्मीचे ज्ञान दिले आहे, आता मी कृतकृत्य झालों आहे, मला आता कोणत्याहि प्रकारचा सशय नाही, मी शांत झालों आहे, मला परम आनद प्राप्त झाला आहे, मी केवळ सुखस्वरूप आहे इत्यादि प्रकारची ही भ्राति झाली आहे. ज्या क्षणी तू पूर्वी मरण पावलास त्याचक्षणी तुझ्या हृदयात ही प्रतिभा उदय पावली. ज्याप्रमाणे नदीतील भोवन्यामध्ये जलाचा प्रवाह वारवार फिरत रहातो त्याप्रमाणे चित्तप्रवाह अशा अनेक भ्रमाच्या द्वारा वारवार फिरतो. ज्याप्रमाणे भोवऱ्यामध्ये एकदाच दोन तीन आवर्त (भ्रमणे) सुरू होतात त्याप्रमाणे केव्हां केव्हां (जाप्रतीत ) मिश्र ( म. दुसऱ्या जीवाच्या सर्गाशी सबद्ध होऊन ) व कचित् ( स्वप्नात ) अमिश्र सर्गशोभा उत्पन्न होते. चैतन्य-सूर्य असा जो तू त्या तुजपासून मरणसमयींच ही प्रतिभा उद्भवली. स्वप्नभ्रमामध्ये ज्याप्रमाणे शभरवर्षे झाल्याचाही केव्हा केव्हा भास होतो त्याप्रमाणे तुझा हा सर्व कालाचा भास आहे. नावेतून बसून जात असताना तीरावरील वृक्ष चालत आहेत, असे वाटते, मेघ धावत असताना चद्रच धावत आहे, असा भ्रम होतो, भोवळ (घेरी ) आली असता घर व त्यातील सर्व पदार्थ गरगर फिरत आहेत, असे दिसते, पित्तप्रकोप झाला असतां रात्री डोळ्यापुढे नानाप्रकारच्या आकृति व तेजे दिसतात; स्वप्नामध्ये आपण आपलेच मस्तक कापिले आहे, असा भास होतो. त्याप्रमाणेच तुला ही मिथ्या ससारभ्राति झाली व दीर्घ वासनेमुळे ती दृढ झाली. पण वस्तुत. तू कधी जन्मास आला नाहींस व मरणही पावला नाहीस. तू शुद्ध विज्ञानरूप आहेस, शात आहेस व निर्विकार आहेस. दृश्य मिथ्या असल्यामुळे त्याने युक्त असलेले चिदाभासलक्षण दर्शनहीं मिथ्या ठरतें. शेवटी विषयरहित केवल चैतन्य रहाते. ते मात्र सत्य आहे. यास्तव वस्तुतः काहीएक नसताच अनात्मज्ञ प्राणी जग पहातो पण आत्मा सर्वरूप असल्यामुळे, त्याच्याच आश्रयाने हा सर्व भास होतो, हे त्यास कळत नाही खरोखर पाहिल्यास भूपीठ नाही, हा तुज विदूरथाचा देह नाही, हे पर्वत नाहीत, ग्राम नाहीत, हे लोक नाहीत व आह्मी नाही. तर गिरिग्रामातील ब्राह्मणाच्या मडपाकाशात तें लीलेच्या पतीचे विस्तृत जग भासले, त्यातच अनेक उत्तमोत्तम गृहादिकानी भरलेली लीलेची राजधानी भासली, त्यातील आकाशातच हे जग भासले व त्या