पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ बृहद्योगवासिष्ठसार. मला यावेळी सत्तर वर्षे झाली आहेत. पूर्वी केलेल्या अनेक कार्याचे मला यावेळी स्मरण होत आहे. मला पितामहाचे स्मरण आहे. माझें मागच्या जन्मींचे बालपण, तारुण्य, मित्रवर्ग, बंधुसमूह व इतर परिवार यांचे मला म्मरण होत आहे. पण या माझ्या स्मरणास काय ह्मणावें १ ( अधिष्ठान चिन्मात्रच या सर्व प्रपचाचें सत्त्व आहे व त्यावाचून इतर सर्व मायामात्र आहे, हे परम रहस्य सागण्याच्या उद्देशाचे प्रथम ज्ञप्ति देवी लोकातरगमन झणजे पुष्कळ कालानतर दूरदेशी होणारे गमन हा भ्रम घालविते-) अप्ति-राजा, मरणसशक महामूर्छनतर याच तुझ्या गृहात-हणजे त्याच्या अधिष्टान-चिदाकाशातील मागच्या ( म. मायावरणाने आवृत्त झालेल्या ) गिरिग्रामातील ब्राह्मणाच्या गृहामध्ये असलेल्या त्या पद्मराजाचा लोकातर असून त्यांतील मुख्य राजगृहाच्या आतील आकाशातच हा ब्रह्माडमडप आहे. ( तात्पर्य चिदाकाशातच मागच्या सर्व जन्मातील ब्रह्मांडें होती व ती त्याच्या बाहेर कधीही नसतात.) त्या ब्रह्माडमडपातच हा तुझा प्रतीत होणारा जन्म भासतो. तर मग काय, तेच ब्राह्मणाच जग मला आज असे दिसत आहे ? असे विचारशील तर सागते. बाबारे, असे नाही. प्रत्येकास जगद्गृह भिन्न भिन्न भासत असते ब्राह्मणाच्या गृहांत असताना तुझा जीव माझा भक्त होता. त्याचे भूपीठ तेथेच राहिले. पण त्याच्या मडपामध्ये व त्याच्याच गृहामध्ये हे पद्माचे ससार- मडल झाले. पुढे त्याच पद्मगृह-मडपात हे तुझें, अनेक क्रिया करण्यात गुतलेले, गृह झाले. त्यातील निर्मल माकाशाप्रमाणे निर्मल असलेल्या तुझ्या चित्तात हा मी अमुक दिवशी या इक्ष्वाकु कुलात जन्मास आलो. माझे अमक्या अमक्या नावाचे पूर्वज होते. मी पूर्वी बालक होतो. दहाव्या वर्षीच माझ्या पित्याने मला राज्य दिले व तो वानप्रस्थ झाला. तेव्हा पासून मी अनेक पुरुषार्थ करून हे राज्य राखिलें, त्याची वृद्धि केली, त्यातील प्रजेचें पुत्राप्रमाणे प्रतिपालन केले, यज्ञादि धर्मकृत्ये केली, यावेळी मला सत्तर वर्षे आहेत, है सैन्य चालून आले आहे, त्याच्याशी माझे सैन्य दारुण सग्राम करीत आहे, मी आताच युद्ध करून परत गृही आलो आहे, या देवी येथे आल्या आहेत, मी आता याची पूजा करितो, कारण देवताचे पूजन केले असता त्या आपला मनोरथ पूर्ण करीत असतात, त्यांतील एका