पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५६ बृहद्योगवासिष्ठसार. सर्वत्र सभवते ह्मणजे त्यास कोठेच प्रतिबध होत नाही. तेंच स्फुरणरूप होऊन मानस विषयाच्या निश्चयापर्यत परिणाम पावते व वेदन ह्मणजे यथार्थज्ञान होते. तेच आतिवाहिक शरीर असून त्यालाच सूक्ष्म देह ह्मणतात. तेव्हा अशा त्या देहास कोण कसा प्रतिबंध करणार ? ३५-४०. संग ४१-या सर्गात-निजून उटलेल्या राजाने आपल्या गृहात प्रविष्ट झालेल्या __ त्या दोघीचे केलेले पूजन, राजाचा वश, स्मृति व ज्ञप्तीने केलेला आत्मो- पदेश-याचे वर्णन केले आहे. श्रीवसिष्ठ-त्या दोघी देवी प्रविष्ट झाल्या असता ते शय्याग्रह, दोन चद्राचा उदय झाला असता अतरिक्ष व भूभागही जसा शोभायमान होतो त्याप्रमाणे, मुशोभित झाले. त्यात मदारपुष्पावरून येणारा मद, सुगध व शीतल वायु वहात होता. त्याच्या प्रभावाने त्या गृहातील इतर सर्व स्त्री-पुरुप निद्रित झाले होते. ते गृह त्यावेळी नदन- वनाप्रमाणे सौभाग्यसपन्न झालेले असून त्यातील सर्व प्रकारची व्याधि नष्ट झाली होती. असो, त्या दिव्य स्त्रियाच्या चद्रतुल्य प्रभेचा स्पर्श शरीगम होताच अमृताच्या सेकाप्रमाणे आनदित झालेला तो राजा जागा झाला. तो साकल्पिक दोन आसनावर बसलेल्या त्या दोबी त्याच्या दृष्टी पडल्या. त्यास पहाताच मेरूच्या दोन शिखरावर उगव- लेली ही दोन चद्रबिबेच आहेत, असा त्यास भास झाला पण क्षणभर विचार करून तो विस्मित झालेला भूपाल, शेषावरून उठणाऱ्या चक्र- गदाधराप्रमाणे, शय्येवरून उठला. त्याने आपले परिधानीय वस्त्र, गळ्यातील भूषणे व माळा नीट सावरून अस्ताव्यस्त झालेले केस गोळा केले आणि मोठ्या आदराने जवळन्याच पुष्पाच्या करडीतील ओझळभर फुले घेऊन व त्याच्यापुढे येऊन “ जन्म, त्रिविध ताप व भक्ताचा मोह, याचा नाश करणान्या तुझा देवीचा जय-जयकार असो" असें ह्मणून ती पुष्पाजलि त्याच्या चरणी समर्पण केली. नतर तो वीर त्यांच्यापुढे पद्मासन घालून बसला. तेव्हा लीलेस त्या राजाच्या जन्मा- दिकाचा वृत्तांत कळावा म्हणून देवीने आपल्या प्रभावाने जवळच्या त्याच्या एका मव्यास जागे केले. त्यानेही जागे होताच त्या दिव्य स्त्रियास पाहन त्यांची प्रेमपूर्वक पूजा केली व तो त्याच्या पुढे बसला. तेव्हां अति देवी प्रणाली-राजा तू कोण, कोणाचा पुत्र व येथे कधी जन्म