पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ३५-४०. २५५ ब्रह्मादि आजपर्यंत होऊन गेले आहेत, जात आहेत व पुढे जातील. ब्रह्माच्या ठायी असत्स्वरूप भासणान्या त्या(ब्रह्मादिका )च्या कल्पनाची गणना करण्यास कोण समर्थ आहे ? (येयवर ब्रह्माच्या ठायी जगाच्या आरो- पाचा क्रम सागून आता अपवाद सागतात.) याप्रमाणे भितीसारखे म्थूल असलेले हे जग सकल्प-सज्ञक सूक्ष्म मननाहून निराळे नाही. श्रीराम-गुरुवर्य, पण हे स्थूल जग स्थिरस्वभाव आहे. म्हणजे याचा स्वभाव कधी बदलत नाही व मन तर अति चचल. तव्हा स्थिरस्वभाव जग अस्थिरस्वभाव मनोमात्र कसे असेल ? श्रीवसिष्प-राघवा, बाह्य विश्व जरी स्थिरस्वभाव असल्यासारखें वाटले तरी मनाच्या योगाने त्याची यथेच्छ कल्पना करिता येत असन्या- मुळे, ते अस्थिरस्वभाव आहे, असाच अनुभव येतो. मन भ्रमण करीत असले तर ते भ्रमण करीत असल्यासारखे, मन प्रसन्न असले तर ते प्रसन्न असन्यासारखे, मन मलिन असले तर ते मलिन असत्यासारखे वाटते व मनोरथादिकामध्ये ते उत्पन्न करून अन्यत्र आरोपित केल्याप्रमाणे सर्वास अनुभव येतो. यास्तव तूही आता आपल्या अनुभवानेच विचार कर. ह्मणजे मन चिदाकाशरूप असून माक्षि चिदाकाशच परम पद आहे, असे तुला समजेल. जसे जलच आवर्त ह्मण भोवरा असून भोवरा ही काही सत् वस्तु नव्हे, त्याप्रमाणे द्रष्टाच दृश्याच्या आकाराने भासत अमन दृश्य ही सत् वस्तु नव्हे असत्य किवा अनादि मायाकाशात अथवा चित्ताकाशात जीवभावाने झालेले जे स्फुरण तेच नाम व रूप या आका- गर्ने होणारे द्वैत होय. नाना आकाराने विकार पावणे हेच ज्याचे शील आहे अशा त्या द्वैतासच जगत् ह्मणतात. पण ते आकाशात भासणाऱ्या गर्वनगराप्रमाणे असून अधिष्टानभूत चिदाकाशच तत्त्व अथवा परमार्थ आह अधिष्ठानसत्ता सत्य असून आरोपित सत्ता असत्य आहे मी, तू इत्यादि ह्मणणारा जगाचा प्रमाताही साक्षि चिन्मात्रस्वभाव आहे. जीवस्त्र- भाव नाही लीला व सरस्वती या दोघीही आकाशशरीरी झणजे केवल मत्यमकल्प-चित्ताकाशशरीर आहेत. त्या सर्वगामी परमात्म्याप्रमाणे स्वच्छ, अन्रल्यामुळे त्याना अत्यत सूक्ष्म छिद्रातही प्रतिबध होत नाही. आकाशात न्यान्या इन्छेप्रमाणे त्याना पाहिजे तये आविर्भूत होता येते. त्यामुळेच न्यास त्या विदूरथाच्या गृहातही प्रवेश करिता आला. तात्पर्य चिदाकाश