पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५४ बृहद्योगवासिष्ठसार. यानी ते भासमान जग सुदर झाले आहे. जरा, मरण, विकलता, व्याधि इत्यादिकानी भरलेली मर्त्यलोकादि छिद्रे त्यात आहेत त्यातील चराचर प्राणी आपल्यास अनुकूल असेल ते सपादन करण्याचा व प्रतिकूल असेल त्याचा परिहार करण्याचा प्रयत्न करीत आहेत ( येथे चर ह्मणजे एक स्थळ सोडून दुसऱ्या स्थळी जाणारे मनुष्य- पशु-पक्ष्यादि प्राणी व अचर ह्मणजे स्वस्थल सोडून न जाता तेथेच इष्ट- प्राप्ति व अनिष्ट-परिहार करण्याचा प्रयत्न करणारे वृक्ष, वेली इत्यादि प्राणी, असे समजावे. वृक्ष, लता इत्यादिकास अतःसज्ञा असते. ह्मणजे त्यास आतल्या आत सुखदुःखादिकाचे ज्ञान होते. त्याची जेव्हा वाढ होत असते तव्हा त्यास पुढे काही प्रतिकूळ आढळल्यास त्याचा परिहार करून ती पुढे वाढतात, हे पुष्कळास ठाऊक आहेच. उष्णतेच्या योगाने कोमेजणे, पाण्याचा मेक झाला असता टवटवित होणे, इत्या- टिकावरून त्याचे सजीवत्व व सेद्रियत्व सिद्ध होते.) त्या काल्पनिक जनात समुद्र, लहान पर्वत, भूमि, नद्या, लोकपाल, दिवस, रात्र, क्षण, कल्प, इत्यादि भास होतात. " हा मी अमक्याचा पुत्र, ही माझी माता, है धन, " अशी त्यातील मनुष्यादिकाची वासना असते. हे माझे सुकृत व हे दुष्कृत, असे त्यातील सुज्ञ जन कल्पितात मी मागे लहान होतो, आता मोठा झालो आहे, असे त्यातील बुद्धिमान् जीवाच्या अत.करणात स्फुरण होते. तात्पर्य अशाप्रकारे हा प्रत्येक जीवाचा ससाररूपी वनप्रदेश उद्धवला आहे. या ससार-वनात नक्षत्रे हीच पुष्पे, नील-वर्ण मेघ हीच चचल पालवी, नर हेच पशुसनूह, देव व दानव हेच पक्षी, प्रकाशमय दिवस हीच पुष्पातील धूळ (रज), रात्री याच दुष्प्रवेश्य (प्रवेश न करिता येण्यासारिख्या) जाळ्या (कुज, लतागृहे), समुद्र हिच तळी, मेरु इत्यादि पर्वत ह्याच शिला व चित्तरूपी कमलबीजात सस्काररूपाने असणारे अनु- भव ( चित्तवृत्ति ) हेच अकुर आहेत. एव च हा जीव मरताक्षणीच हैं जगरूपी वन जेथल्या तेथेच पहातो. याप्रमाणे प्रत्येक प्राण्याच्या सकल्पाने निरनिराळे जग उत्पन्न होते व अशी अनेक प्राण्याची अनेक विश्वे निर्माण झाली असता ब्रहाडात असलेल्या-पर्वत, समुद्र, द्वीपे, लोका- तर-इत्यादिकास पहाणाऱ्या ब्रह्मा, विष्णु, मटेग, इद्र, देव, रुद्र, सूर्य इत्यादिकांच्या कोटीच्या कोटी निघून जातात. याप्रमाणे असख्य