पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ३५-४०....। २५३ ।। 4.10 / Fth प्रमाणप्रथात सागितले आहे व जीवाची सृष्टि तर एकाएकी ( क्रमांची अपेक्षा न धरिता ) उद्भवते, असे आपण पहातो. तेव्हा दोन्ही सृष्टी एकसारख्याच कशा असतील ? श्रीवमिष्ठ- राघवा, जीवान्या सृष्टीतही तसाच क्रम आहे. ह्मणजे जीवाची सृष्टिही ईशसृष्टीच्या क्रमानेच उद्भवते. कशी ह्मणून विचारशील तर मागतो. जीव मरण व मूर्च्छी याच्या शेवटी आतल्या आत स्फुरण- युक्त असल्यासारिखा व बाहेर स्फुरणयुक्त नसल्यासारिखा असतो. तेच प्रगन होय त्या अवस्थेत असणारे ते प्रवानच मूल प्रकृति आहे. त्याला आकाश व अव्यक्त असेही ह्मणतात. चैतन्याच्या प्रतिबिवाचे ग्रहण केल्यामुळे ते जडाजड झणजे स्वाशत. जड व चैतन्याच्या अशाने अजड असते. हीच सर्गाच्या आरभाची व प्रलयाची अवधि आहे. ह्मणजे ससाराचा उद्भव याच्यापासून होतो व, त्याचा लयही यातच होतो. असो, हे प्रधान जव्हा बोधोन्मख हाते, ह्मणजे बोवास तयार होते तेव्हा त्यास महत्तत्त्व ह्मण- तात. तेच प्रबुद्ध ( बोधयुक्त ) झाले की, अहकार बनते. त्या अहकार-अवस्थेतील आकाशापासून पचतन्मात्रे, दिशा, काल, क्रिया, भूते इत्यादि उद्भवतात. ते प्रधानच सूक्ष्मावस्थेतील ज्ञानेद्रियपचक, ( कमेद्रियपचक, प्राणपचक व अतःकरण ) होते. तेच स्वप्न व जाग्रत् या अवस्थात देहास जाणते व तो सूक्ष्मसमूहच आतिवाहिक देह आहे. दीर्घकाल अनुभव आल्यामुळे तो अतिशय पुष्ट झाली आहे. तो बालकाप्रमाणे भौतिक स्थूल दहास 'मी ' असे समजतो. त्यामुळे त्या स्थूलदेहाचा आश्रय करून राहिलेल्या नेत्रादि साधनाच्या अधीन अस- लेले दिशा-काल इत्यादिकाविषयीचे सकल्प उद्भवतात. पण स्पद- रूप वायूच्या स्पदाप्रमाणे ते मनोमय असल्यामुळे वस्तुत अनुदित- (ह्मणजे उत्पन्न न झालेले )च असतात. तात्पर्य येणेप्रमाणे हा भुवनभ्रम व्यर्थ वृद्धिगत झाला आहे. तो असत् असूनही स्वप्नातील स्त्रीच्या आलिंगनाप्रमाणे अनुभवास येतो. चित्त आगतुक देहादिरूप होते आणि " हा मी " व " हे जग " असा त्यास भ्रम होतो. इंद्रादि देव, अमरावती इत्यादि त्याची नगरे, मेरु इत्यादि त्या नगराचे आधार- भूत पर्वत व त्यास प्रदक्षिणा करणारे सूर्य, नक्षत्रे इत्यादि ज्योतीरूप पर