पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ बृहद्योगवासिष्ठसार. अर्थात् त्याने कल्पिलेल्या प्रपचास मिथ्या ह्मणता येत नाही. या आगयाने राम विचारितो.-) श्रीराम--ज्याप्रमाणे व्यष्टि जीव मरणानतर लागलाच उत्तर काली स्वस्मतीने उत्पन्न केलेला देह पहातो न्याचप्रमाणे समष्टिही महाप्रलयानतर आपल्या यथार्थ स्मृतीच्या योगाने उत्पन्न केलेल्या प्रपचाचा अनुभव घेतो. तेव्हा त्याच्या स्मृतीवर आरूढ झालेले पूर्वीचे सत्य पदार्थच या कल्पातील सत्य विश्वाचे कारण आहेत, असे ह्मणता येणे शक्य असताना, विश्व ब्रह्मा- तिरिक्त सत्य-कारणता-शून्य आहे. ह्मणजे ब्रह्मावाचून त्याचे दुसरे काही सत्य कारण नाही, असे कसे ह्मणता येईल ? श्रीवसिष्ठ--रामा, आदिसर्गास हिरण्यगर्भाची यथार्थ अनुभवजन्य स्मृति जर कारण झाली असती तर तू ह्मणतोस तसा आमच्या सिद्धातावर दोष आला असता पण अगदी प्रथमच उपासने- मुळे जो हिरण्यगर्भपदास प्राप्त झाला आहे त्याला तू म्हणतोस तसली स्मृति होणे शक्य नाही. कारण त्याचे स्मरण पूर्व उपासनेप्रमाणे चित्तात दृढ झालेल्या संस्कारामुळे उत्पन्न होत असल्याकारणाने ते यथार्थ अनुभव- जन्य आहे, असे ह्मणता येत नाही. कारण पूर्वी व्यष्टि-अवस्थेत अस- ताना मीच समष्टि जीव (हिरण्यगर्भ) आहे, अशी भावना करणे हीच त्याची पूर्व उपासना होय कोणतीही भावना काल्पनिक (अयथार्थ) असते. त्या भावनामुळेच तो उपासक या कल्पाच्या आरभी हिरण्यगर्भ होतो व त्याला त्या अयथार्थ उपासनेमुळेच कल्पाची स्मति होते यास्तव आदि सर्गास सत्य ह्मणता येत नाही त्यावेळी पूर्वीच्या सर्वज्ञापैकी कोणीही नसतो. कारण ते सर्व पूर्व प्रलयसमयी हिरण्यगर्भाबरोबर मुक्त होऊन गेलेले असतात, इत्यादि मागे सागितलेच आहे. तेव्हा कोणत्याही युक्तीने आदि सर्ग सत्य आहे, असे सिद्ध करिता येत नाही कल्पाच्या अगदी आरंभी उत्पन्न होणाराही सग जर मिथ्या आहे तर त्याच्या सस्कारा- पासून होणाऱ्या स्मृतीमुळे पुढे होणारे अनेक सर्ग तरी सत्य कसे असतील ? यास्तव, बा उत्तम शिष्या, जीवकृत सृष्टीप्रमाणे ईशनिर्मित सृष्टिही मिथ्या आहे, असेच तूं जाण. श्रीराम-गुरुराज, हिरण्यगर्भाची सृष्टि प्रधानापासून महत्तत्त्व, महत्तत्त्वापासून अहंकार इत्यादि क्रमाने उत्पन्न होते, असे पुराणादि