Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० बृहद्योगवासिष्ठसार ष्ठानाच्या सत्तेन्या अधीन असते. पण त्यातील एक प्रतिबद्ध होऊन रहाते व दुसरे ययेन्छ सचार करू शकते. कारण पाहिजे त्य' पदार्थात प्रकट होण्याची शक्ति चित्तशरीरात असते. अशी शक्ति त्याच्यामध्ये का व कशी येते ह्मणून विचारशील तर सागतो पूर्ववासना व कम याच्याप्रमाणे त्यास जसे पदार्थस्फुरण होईल त्याप्र माणेच (अगदी जसेच्या तसे ) स्वत होणे हा त्याचा स्वभाव आहे. बाह वस्तु, वस्तुत जशी असेल, तसे होणे हा त्याचा स्वभाव नाही. ह्मणून पुढे खरोखर शिप असताना मनुष्य आपल्या चित्तगत स्फुरणाप्रमाणे तिला रुपे समजतो. पण स्थूल शरीर बाह्य वस्तून्या अनुरोधाने रहाते त्यामुळे त्याला छिद्रादि बाह्य वस्तूकदन निरोध होतो आणि सूम चित्तशरीर स्वतत्रपणे वाह्य वस्तूस बनवीत असल्यामुळे कोठेही निरु, होत नाही ते त्रसरेणूमध्ये रहात, आकाशास व्यापून सोडते. अकु- रान्या कोशा( कोबा ,त रहाते, कोवळ्या पानाच्या आकाराचे होते णण्याच्या लाटेत बसते, शिलेन्या उदरात प्रवेश करिते मेघ होऊन वर्षाव करिते व स्वय शिन्या होते ते आपल्या इच्छेप्रमाणे आकाशात जाते. पर्वतान्या उदरात शिरते व ज्याच्यामध्ये आकाश मुळीच नाही अशा परवस्तुमही ते धारण करिते ते स्वत आकाश होऊन त्यात (ह्मणजे स्वरूपातच ) पद्मराजाच्या गृहासारिख्या कोट्यवधि गृहरूप बनते सागश कधीही रिन्न न होणारा असा विशेप बोव ज्यास आहे, असे हे चित्तशरीर आकाशादि कमाने ब्रह्माडरूप होऊन प्रस्तुत कर्मानुसारी प्रवृत्तीम प्राप्त झाले आहे पण ही सर्व प्रवृत्ति मृगजळाप्रमाणे, वध्या- पुत्राप्रमाणे व स्वप्नातील वस्तृप्रमाण जनत्य आहे. श्रीराम- महाराज, हे आमचे चित्तहि आपण सागता तशाप्रकारच्या शक्तीने युक्त होऊ दाफेल की नाही ? जर होईल असे झटले तर प्रत्येक चित्ताने भिन्न भिन्न आकाराने करपलेले प्रत्येक जग सद्रप कसे नाही ! व आमचे चित्त त्या शक्तीने युक्त होऊ शकणार नाही असे जर झटले तर ते जग आमच्या चित्ताहून निराळे कसे नाही? अर्थात् निराळे असले पाहिजे. श्रीवसिप्र—प्रत्येक प्राण्याचे चित्त अशा प्रकारच्या शक्तीने युक्त आहे प्रत्येक चित्तास निरनिराळ्या जगाचा भ्रम झालेला आहे.