पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ३५-४०. २४९ आला तरी त्यामुळे सत्य वस्तूस प्रतिबध होत नाही. आता तूं म्हणशील की, अधिष्ठानभूत सविदच्या ठायी स्थौल्य, सौम्य इत्यादि शक्तीचा जरी आविर्भाव झाला तरी चित्त त्या त्या शक्तीप्रमाणे कसे होते ? तर सांगतो. जशी सवित् शक्तिरूप होते तसेच चित्तही शक्तिरूप बनते. पण योग (चित्तनिरोध ) व ज्ञान ( विचार ) यान्या योगाने दीर्घ प्रयत्न केला, असता ते पुनः स्वाभाविक अवस्थेस प्राप्त होते. (आता ज्ञानप्रयत्नाने भ्रमाचा क्षय कसा होतो, ते उदाहरण देऊन सागतात.-) पुढे दोरी अस- तांना भ्रमाने हा सर्प आहे, असा प्रत्यय येतो. पण त्याच्या यथार्थ ज्ञाना- करिता प्रयत्न केला असता ही दोरी आहे, असा निर्णय होऊन भ्रात सर्प आपोआप निवृत्त होतो. परतु तत्त्वज्ञानाकरिता प्रमाणाच्या सहा- याने प्रयत्न न केल्याम तो भ्रम जशाच्या तसाच रहातो साराश जशी सवित् तसे चित्त व जसे चित्त तशी क्रिया. ह्मणजे चित्त जसे सवित्-- शक्तयनुसारि असते तशीच प्राण्याची चेष्टा चित्तानुसारी असते, हे आबालवृद्धास ठाऊक आहे. आता-स्थूल शरीराप्रमाणे आतिवाहिक चित्त- शरीरही प्रतिबद्ध का होत नाही ?–झणून ह्मणशील, तर सागतो. स्वप्ना- तील व सकल्पाने कल्पिलेला पुरुष चित्राच्या आकाराप्रमाणे काल्पनिक असतो. त्यामुळे केवल आकाश हाच त्याचा आकार असतो. तेव्हां न्याला प्रतिबध कोण करणार ? पण या स्थूलशरीराला, ज्ञानबलाने तरी, चित्तशरीरत्वाची प्राति कगी होणार ? असे ह्मण नये. कारण सर्वाचे_शरीर सर्वप्रकारे चित्तमात्र असते हृदयगत ज्ञानाच्या बातें ते भासत असल्यासारखे वाटते. यास्तव प्राणी चित्ताहून पृथक नाहीत. त्याची सत्ता ( अस्तित्व ) चित्ताच्या सत्तेहून निराळी माही. परमात्म्याच्या चित्तवृत्तीप्रमाणेच या भूतमात्राचा ( सर्व भृताचा) उदय व अस्त होत असता. सृष्टीच्या आरभी स्वाभाविक अज्ञान (किंवा कर्म ) याच्या योगाने हे सर्व उद्भवते. नतर-स्थूल भने व त्याची कार्ये- हे द्वैत; त्या सर्वाचा मिळून एक देह होणे, हे ऐक्य आणि त्या सर्वाचे कारण पचीकरण होते. यास्तव चित्ताकाश, चिदाकाश व तिसरे भूताकाश ही तिन्ही एकासत्तेनेच सत्तायुक्त झाली आहेत, असे तू जाण. कारण अधिष्ठानाच्या सत्तेहून त्याची सत्ता निराळी आहे, असे अनुभ- वास येत नाही. याच न्यायाने स्थूल व सूक्ष्म शरीरांची सचाही अधि-