पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीराम-प्रभो, हे शरीर तीन-चार हात लाब आहे. तेव्हा तंतसारख्या सूक्ष्म रध्रातून त्या त्याच्या गृहात मत्त्वर कशा जाऊ शकल्या ? (रामाने पूर्वीही असाच प्रश्न केला होता पण येथे आणखी काही अधिक सागण्याकरिता पुनः तोच प्रश्न केला आहे.) श्रीवशिष्ठ-निष्पाप रामा, हा आधिभौतिक (स्थूल) देहच, मी आहे, असा भ्रम ज्यास झाला असेल त्याचा तो देह अतिसूक्ष्म रध्रातून जाणे शक्य नाही. मी या शरीराच्या योगाने प्रतिबद्ध झालो आहे, त्यामुळे मी यात मावत नाही,असे ज्याच्या बुद्धीस वाटत असते त्याची बुद्धि पूर्वी शतशः अनुभवलेले देहतादात्म्यच पुनरपि अनुभविते. म्हणजे 'मी देह आहे' असे तिच्या अनुभवास येते व त्यामुळे, स्थूल शरीराचा प्रवेश सूक्ष्म रध्रात होत नाही, असे पाहून, मी यातून जाऊ शकणार नाही, असे ती समजते. पण देहतादात्म्यबुद्धि क्षीण झाल्यामुळे मी सूक्ष्म (आतिवाहिक) शरीरमात्र आहे, असा ज्याच्या मनाचा निश्चय झाला आहे व त्याप्रमाणे पूर्वी शतशः अनुभव घेतल्यामुळे मी अतिसूक्ष्म छिद्रातूनही जाण्या-येण्यास समर्थ आहे, अशी ज्याची वासना दृढ झाली आहे, तो पुरुष पुढे तरी स्थूल शरीराच्या योगाने प्रतिबद्ध कसा होणार ? कारण विचाराच्या योगाने एकदा व्यक्त झालेली नित्य व स्वाभाविक शक्ति प्रतिबद्ध होणे शक्य नाही. व्यवहारातही घस्तूचे स्वाभाविक धर्म कधीही बदलत नाहीत, असेच आपण पहातो. पाण्याचा स्वभाव सखल प्रदेशाकडे वहात जाणे, हा आहे. तसाच माया ज्वालेचा स्वभाव वर जाण्याचा आहे व तो जगाच्या भारंभापासन प्रलयापर्यत बदलणे शक्य नाही. कारण पाणी स्वभावत च उचवट्याकडे वहात जाईल व अग्निशिखा अधोमुखकधीतरी होईल, अशी आशा करणे व्यर्थ आहे. जलादिकाच्या स्वभावाने चित् जशी प्रकृत झाली आहे तशीच ती रहाणार, यात सशय नाही. स्थूल देहास आत्मा न समजणाऱ्या-योगी, पिशाच, इत्यादि प्राण्यासही जर स्थूल शरीराच्या निरोधामुळे दु ख होत नाही तर द्वैताध्यासरहित तत्त्वज्ञा- न्यास त्याच्या योगाने दुःख होणार नाही, हे काय सागावे । कारण जो दाट शीतळ छायेमध्ये बसला आहे त्यास सूर्याचा ताप कसा होणार ! तात्पर्य परमात्म्याचा साक्षात्कार झाला असता दुसऱ्या कोणत्याही पदा- र्थाचा सत्यरूपाने अनुभव येत नाही व मिथ्या पदार्थाचा अनुभव बरी