पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ बृहद्योगवासिष्ठसार. वाऱ्याच्या सोसाट्याने पडलेली पुष्पे, व मृत शरीरे हेच मोडून पडलेले वक्ष होत. साराश येणेप्रमाणे तो सर्व जगाचा प्रास करण्यास तयार झालेला युद्धकल्पात चालला होता. त्यातील रथरूपी नगरे ध्वज, छत्र व पाताका यासह अस्ताव्यस्त होऊन पडली होती. एकमेकावर पडणारी चकचकीत शस्त्रे हेच त्यावेळी जगाचा नाश करण्याकरिता उगवर्टले प्रखर सूर्य आहेत, असा भास होत असे. त्यानी कठीण प्राण- सतापाने सर्वांच्या मनास सतप्त केले. त्या रणागणातील वनुष्ये हेच प्रलयसमयी मुमळवारानी वर्षाव करण्याकरिता अतरिक्षात आलेले पुष्कारावर्तादि नेध आमून ते शरधाराचा एकसारखा वर्षाव करीत होते व त्या( मंघामध्ये, शाणेवर घासून तीक्ष्ण केलेल्या खड्गाच्या धारा हेच, विजेचे चमकणं असून ते सर्व आकाशास चकचकीत करीत होते रक्तमय भूमीवर मरून पडलेले गज हेच कल्पातसमयीं समुद्रात उलयन पडणार कुल पर्वत होते. आकाशात उडणारे रक्ताचे थेब ह्याच त्यावेळी अशुभ मुचाकण्यकरिता उगवलेल्या तारा होत. रामा, त्या भयकर युद्धप्रलगा नर्णन करावे तितके थोडेच होणार आहे. यास्तव मी आता अधिक विस्तार करीत नाही. त्या दोन्हसिन्यातील लोक एकमेकाशी भिडून एकमेकाची शरीरे छिन्न भिन्न करून मोडू लागले. हत्तीवरील लोक हत्तीवरील लोकाशी; पी रथ्याशी, बोडस्वार घोडेस्वगशी व पायदळातील वीर पायाने चालणान्या लोकाशी लढत होते. त्याचा तो भयकर सग्राम सर्व दिवसभर चालला. त्यात कित्येकदा एका पक्षाचा विजय होतो, असे वाटे व कित्यकदा दुसन्या पक्षाचा जय झाला असा भास होई. पण ती दोन्ही सन्ये सारखीच राक्षसी असल्यामुळे, निश्चित जय-पराजय कोणा- चाच होईना. यमराजास मनापासून साह्य करण्याकरिता त्यातील प्रत्येक जीव प्रयत्न करीत होता. त्याना जणु काय आज आपण त्या सर्व भक्षकाची नित्य तृप्तिच करून सोडणार, असे वाटत होते. पण त्या खळ्याना काय ठाऊक की, तो अनत विश्वे पचविणारा अधाशी देव या थोड्याशा चटणीन मुळीच तृप्त होणार नाही । पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तरव मध्यप्रदेश यातील सर्व देशचे व सर्व जातीचे सर्व वीर पुरुष त्यावेळी तेथे मोळा झाले होते व त्यांनी विद्येच्या नावाने सपादन केलेली ही हिंसकांची