पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ बृहद्योगवासिष्ठसार. वाटते. कोणी ऐक मुख्य ह्मणतो-अरे मूर्खानो, पुढे व्हा. एक पाऊल- भरही मागे सरू नका. अरे, शस्त्रप्रहाराच्या योगाने व्याकुळ होऊन भूमीवर पडलेल्या या आपल्याच लोकाच्या अगावर पाय देऊन पुढे जाऊ नका, तर रिकाम्या लोकास त्याना एकीकडे उचलून नेण्यास सागा. देव ह्मणतो-मित्रा, या अप्सरा बचडा बा- धण्यात व्यग्र झाल्या आहेत व इतक्यात हा शूर दिव्यशरीराने त्याच्याजवळ येऊन उभा राहिला आहे, पहा. एक अप्सरा आपल्या सखीस ह्मणते,अग सखे, हा बिचारा फार दुरून व थकून-भागून आला आहे. यास्तव शीतल, मद व सुगध वायु जथ वहात आहे व जेथे दाट छायाही आहे अशा ( स्वर्गातील ) मदाकिनीच्या तीरी याला घेऊन जा व त्याचे चित्तरजन कर. नानाप्रकारच्या आयुधाच्या आघातानी अनेक प्राण्याच्या शरीरातील हाडे मोडून त्याचे शतशः तुकडे अतरिक्षात उडत आहेत. साराश याप्रमाणे अनेक प्रेक्षक मन मानेल तसे भाषण करात होते सन्यातील वीरही प्रसगास अनुरूप असे भाषण करीत होते कोणी हसत होते, कोणी खेद करीत होते कोणी आपला अमोव प्रहार व्यर्थ झाला ह्मणून हळहळत होते, तर कोणी अजून आपले आयष्य सपलें नाही, असे ह्मणून अधिक उत्साहाने शत्रूशी झुजत होते. कोणी तर वीर-धर्मास विसरून प्राणवायूच्या लोभाने रणागणातून पळ काढ- ण्याच्या विचारात असून आपल्या मित्रासही तशीच प्रेरणा क- रीत होने ३४. सर्ग ३५-४०-आता या सगात श्रीवसिष्ट त्या सप्रामाच समुद्र, वन, कपात इत्यादि अनेक रूपकानी वर्णन करून सारख्या आयुधाच्या वीराचे द्वद्व- युद्ध, दोन्ही पक्षातील राजास सर्व देशातील लोकानी कलल साह्य, जय व पराजय याचा अनिश्चय, सायकाळा युद्ध समाप्त करण्याचा दोन्हीं पक्षाचा निश्चय, रात्र पडताच पश्वादिकाना व निशाचरानी तेथे केलेले बीभत्स आचरण, राजा विदृरयाचे शयन व दोघी देवीनी त्याच्या गृहात केलेला प्रवेश याचे वर्णन केले आहे श्रीवसिष्ठ-राघवा, तो सग्राम ह्मणजे एक समुद्रच होता उड्या मारणारे घोडे हेच त्यातील तरग होते. त्याच्या योगानें तो रणसागर मोठे ताडव-नृत्यच करीत आहे, असें वाटे. त्यातील छत्रे हाच फेस असून