पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० बृहद्योगवासिष्ठसार. पक्षी उडत आहेत अशा आकाशाप्रमाणे ( अथवा सरोवराप्रमाणे ) अथवा तारागणानी भरून गेलेल्या अतरिक्षाप्रमाणे दिसत आहे. तुटलेल्या अगातून रक्ताच्या धारा उडत असून त्याचे तुषार सोसाट्याच्य वाऱ्यामुळे वर उडत आहेत व त्या रक्ततुपारामुळे हे मध्याह्न समयींचे मेघ व सूर्य किरण, सध्याकाळच्या मेघासारिखे व किरणासारिखे कसे लाल भडक दिसत आहेत, पहा. आकाशात दूर असलेला कोणी एक रक्ताने भरलेल्या बाणाच्या समूहास पाहून हा मासाचाच ढीग आहे, असा भ्रम झाल्यामुळे, दुसऱ्या कोणास ह्मणतो-भगवन् , हे आकाश असे मासाने का भरून गेले आहे ? त्यास दुसरा उत्तर देतो-अरे वेड्या. ते मास नव्हे. खालील वीराच्या बाणानी भरलेले ते मेघ आहेत. रक्ताच्या योगाने भूमीवरील जितके रेणु भिजतात तितकी सहस्र वर्षे तो वीर स्वर्गलोकी रहातो, असे शास्त्रात सागितलेले असल्यामुळे, हे वीर आपला देह तीक्ष्ण बाणाच्या मार्गात उभा करीत आहेत व त्याच्या रक्ताने लाल भडक झालेले है बाण वेगाने मेघात येऊन रहात आहेत. अरे, असा भिऊ नको. हे नीलकमलाच्या पत्राप्रमाणे दिसणारे निम्निश ( तरवारी) नव्हेत, तर वीराकडे पहाणान्या स्वर्गलक्ष्मीचे (अथवा विजयलक्ष्मीचे) हे कटाक्ष आहेत वीराम आलिगन देण्याविषयी उत्सुक असलेल्या देव-स्त्रियावर अनुग्रह करण्याकरिताच हा सग्राम प्रवृत्त झाला आहे. ( एक वीर दुसऱ्या वीरास ह्मणतो, ) अरे गड्या, तू आता मरून वर येत आहेस, असे समजून या पहा नदनवनातील अतिरमणीय देवता कशा नाचू व गावू लागल्या आहेत ! ग्राम्य स्त्री आपल्या नेत्रविलासाच्या योगाने जशी आपल्या प्रियास व्याकुळ करून सोडिते त्याप्रमाणे ही सेना आपापल्या शत्रची हृदयें कठिण कुठारी( कु-हाडी )नी छिन्नभिन्न करीत आहे सूर्यग्रहण-काल राइस जसा सूर्या-समीप नेतो त्याप्रमाणे, अरे माझ्या पित्या, माझे सुवर्ण- कुडलानी भूषित झालेले मस्तक, या शत्रूच्या बाणाने, सूर्यापर्यंत नेऊन पोचविले. ( एक भितरा दुसऱ्या भितऱ्यास ह्मणतो-) पायापर्यत लोब- गाऱ्या यत्राच्या साखळ्यात ओवलेले व गरगर फिरणारे दोन पाषाण ज्याच्यामध्ये आहेत अशा चक्रदडसज्ञक चक्रास, वर हात धरून, वेगाने फिरविणारा हा योद्धा यमदूताप्रमाणे सर्वत. सैन्याचा सहार करीत इकडेच येत आहे. यास्तव चल, आपण आपल्या मार्गाने परत जाऊ. अरे, ही पहा