पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ३४. २३९ घेऊन हेच पशुकृत्य करावयाचें; दुसरे काय!! ईश्वरा, धन्य आहे तुझ्या मायेची. पहा, तिनें शहाण्यानाही कसे मूर्ख बनविले आहे ! ) कोणी कोणाचा हात तोडीत होता; कोणी कोणाच्या पायावरच शस्त्रप्रहार करीत होता; कोणी कोणाच्या मस्तकास तोडून भूमीवर धुळीत पाडीत होता. कोणी कोणाच्या उरात आपल्या भाल्याचे तीक्ष्ण अम खुपशांत होता; कोणी ओरडत होते; कोणी हाहाकार करीत होते; कोणी मारीत होते; कोणी मरत होते, कोणी भिऊन प्राण वाचविण्याकरिता पळत होते; व कोणी त्याच्या प्राणाचा बळी घेण्याकरिता त्याच्या मागे लागले होते. कोणी आपले शौर्य व युद्धकौशल्य व्यक्त करीत होते. कोणी आपला वर्म समजून आपल्या स्वामीकरिता प्राण जाण्याचा प्रसग आला तरी आपल्या जाग्यावरून थोडेसेही हालत नव्हते. आपला हची शत्रूच्या हत्तीवर सोडून कित्येक मौज पहात होते. कित्येक आपल्या हत्तीस शत्रतील पायदळावर सोडून त्यातील लोकास त्या भयकर प्राण्याच्या पायाखाली तुडवून मरावयास लावीत होते. कित्येक नानाप्रकारच्या युक्त्या योजून शत्रस व्याकुळ करून सोडण्यात तत्पर झाले होते. कोणी सेनाध्यक्ष आपल्या सैन्यसमूहास, शत्रुचे बलाबल पाहून त्याप्रमाणे, निरनिराळ्या जागी नेत होते. कोणी व्यूह-भग होऊ नये म्हणून आपली पराकाष्टा करीत होते साराश येणेप्रमाणे यमाच्याही अगावर रोमाच उभे करणारे ते युद्ध अनेक आयुधे, अनेक वाहने, अनेक पुरुष, अनेक छिन्न-भिन्न देह, अनेक शवे, असख्य नाचणारी कबधे, रक्तपात, आक्रोश, हाहाकार, जयापजयाच्या आशेने निष्ठुरपणे केलेली कृत्ये इत्यादिकाच्या योगाने भया- नक, वीर, बीभत्स व शोक या राजस व तामस रसानी परिपूर्ण होते आणि त्या कोमल मनाच्या साविक स्त्रिया ते साकल्पिक विमानातन लक्ष्य- पूर्वक पहात होत्या ३३. सर्ग-३४ या सर्गात प्रेक्षकाच्या तोहन युद्धचमत्ताराचे विचित्र वर्णन करवितात. श्रीवसित-राघवा, याप्रमाणे ते राजे, मत्री, सेनापती व योद्धे कीर प्राणाचा पण करून परस्पर लढत असताना अतरिक्षातून तो युद्धचमत्कार पहाणाऱ्याच्या व युद्ध करणाराच्या ताडातून असे शब्द निवू लागले.-शूराच्या धडापासून तुटून वर उडणाऱ्या मस्तकाच्या योगाने हे खालचे आकाश ज्यातील कमले हालत आहेत अशा सरोवराप्रमाणे किंवा ज्याच्यामध्ये