पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ बृहद्योगवासिष्टसार. व्यवहार, ध्वनी, रचना, देखावे, आश्चर्ये इत्यादिकाचे तेथे एकाच वेळी दर्शन होत होतें ३२. सर्ग-३३. या सर्गात वरील दोन्ही सैन्याच्या संप्रामास आरंभ झाला व तो त्या दोघी अलौकिक स्त्रियानी पाहिला असे वर्णन करितात. श्रीराम महाराज, त्या दोन्ही सैन्याच्या संग्रामाचा वृत्तात मला थोडक्यात सागा. कारण असल्या कथानकाच्या योगाने तत्त्वज्ञान-श्रव- णाविषयी आलेला आळस नाहीसा होऊन पुनः तात्त्विक उपदेश ग्रहण करण्यास बद्धि सज्ज होते. श्रीवसिष्ठ-रामा, नतर त्या दोघी स्त्रिया सकल्पाने तयार केलेल्या व अतरिक्षात स्थिर झालेल्या विमानात बसल्या. इतक्यात खालचे वीर एकमेकाशी भिड लागले. दोन्ही टळे मिळून गेली व जिकडे तिकडे मार- हाण सुरू झाली. लीलेच्या विदूरथ नामक पतीने प्रतिपक्षातील लोक आपणावर प्रहार करण्याच्या विचारात आहेत, असे पाहून त्यातील एका निर्भय योद्धयावर आपला मद्गर फेकिला. तो त्याच्या उरःस्थळी आपटला व त्यामुळे तो वीर व्याकुळ झाला. पण त्याचे इतर अनुयायी राजावर चाल करून येऊ लागले. ते पाहून विदूरथाचे रक्षण करण्या- करितां ज्यानी पूर्वी प्रतिज्ञा केल्या होत्या ते वीरही पुढे सरसावले. मग काय विचारता! चकचकीत खड्ने सूर्य-प्रकाशात चमकून शत्रूवर पड़ लागली. त्याचा एकमेकावर आघात होऊन खणखण असा ध्वनि निघ लागला. अस्त्राचा कवचादि कठीण पदार्थावर प्रहार झाल्यामुळे अग्नीच्या ठिणग्या उसळू लागल्या. वीर पुरुष मोठमोठ्याने सिंहनाद करूं लागले. धनुष्याच्या गुणाचा टणत्कार श्रोत्याच्या कान- टाळ्या बसवू लागला. मेघधाराप्रमाणे बाणाचा वर्षाव होऊ लागला. तीक्ष्ण शस्त्रधारानी अगें छिन्न-भिन्न झाल्या कारणाने ओरडत व तडफडत पडलेल्या लोकास पाहून दैवी प्रकृतीच्या लोकाच्या मनात दयेचा प्रादुर्भाव झाला. त्यावेळी त्या समरभूमीत एकसारखा सहार चालला होता. कोणी हत्तीवर बसून, कोणी घोड्यावर बसून, कोणी रथात बसून व पुष्कळसे पायानींच यथाशक्ति मारामारी करीत होते. ( मी वाचावें व दुसन्यानीं मरावे, ही प्रत्येकाची इच्छा. मला सर्व चागले हवे, दुसन्यास नसले तरी चालेल, ही प्रत्येकाची भावना व त्याकरिताच हे एवढें रण. या सृष्टीत मनुष्यजन्म