पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ३२. २३७ एकमेकाच्या समोर, थोड्या अतरावर, लाबच लाब ओळीने उभे केल्यामुळे, तो एक मोठा सागर असून, त्याच्या मधील पाच-दहा हात अतर हाच एक त्यावरील मोठा सेतु आहे, असा भास होत होता. सैनिकाच्या कोला- हलामुळे कोणाचे बोलणे कोणालाही ऐकू येईनासे झाले. प्रथम आपणा- सच मार बसेल या मीतीने दुदुभी, ढोल इत्यादि वाद्ये वाजविणारे लोक आपला वाद्य-व्यवहार बद करून एकीकडे होण्याच्या तयारीस लागले. दोन्ही सैन्यामध्ये जे थोडेसे, पण लाबच लाब अतर होते ह्मणून वर झटले आहे त्याच्याकडे पाहून कल्पातवायूने आपल्या वेगाने त्या महासागरास दुभगून सोडले आहे की काय, असा भास होत असे. दोन्ही सेनातील राजास युद्धाच्या परिणामाविषयीं सशय वाटत असल्यामुळे त्याची मने जरा चितायुक्त झाली आहेत, असे त्याच्या आकारादिकावरूनच अनुमान होत होते. त्यावेळी तेथे जे भीरु ( भितरे ) होते त्याची हृदये बेडकाच्या गळ्याखालच्या कातडीप्रमाणे कापत होती. दोन्ही पक्षातील असख्य वीर आपले प्राणरूपी सर्वस्व रणागणी समर्पण करण्यास सिद्ध झाले होते. त्यातील धनुर्धर धनुष्यावर प्रत्यचा चढवून व तिला आकर्ण ओढून शर-वर्षाव करण्यास उद्युक्त झाले होते. आता शस्त्रप्रहार सुरू होणार, असे समजून सर्व युद्धकुशल वीर त्याचा प्रतीकार करण्याच्या तयारीने निश्चल होऊन राहिले. सेनापतीची आज्ञा होताच शत्रूवर सारखा मारा करावयाचा अशा निश्चयाने प्रत्येक वीर निर्दयपणे भुवया चढवून उभा होता जवळ जवळ उभ्या राहिलेल्या सैनिकाची कवचे एकमेकास लागन खटखट असा मोठा ध्वनि होत होता. वीराचे उग्र स्वरूप पाहून तेथील भी- रूंनी पळ काढण्यास जेव्हा आरभ केला त्यावेळी त्यातील प्रत्येकाचे जीवित सशयात पडले होते. चतुरग सैन्याच्या हालचालीमुळे अतरि- क्षात उडालेली धूळ मेघापर्यंत येऊन पोचली. शूराच्या अंगात वीररसाचा संचार व्हावा म्हणून राजाच्या आज्ञेर्ने धम, धम, धम, असा वाद्य ध्वनि चोहोकडे पुनः सुरू झाला व त्यामुळे अतरिक्षही दुमदुमून गेले. पातकांच्या योगाने व हत्तीवर बसलेल्या लोकाच्या वर उचललेल्या हातांमुळे आकाशभागालाही अपूर्व शोभा आली होती. चक्रव्यूह, गरुडव्यूह, श्येनव्यूह इत्यादि व्यूहाची रचना करण्यांत सेनापतींनी आपापलें चातुर्य पुष्कळ खर्च केल्याचे आढळून येत होते. तात्पर्य अनेक शस्त्रे, अखें.