पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ बृहद्योगवासिष्ठसार. धर्माधर्म इत्यादिकांचा विचार न करिता केवळ युद्धात मेल्यानेच स्वर्ग मिळतो, असें ह्मणणे हा मोठा अन्याय होईल. तस्मात् सदाचरणी व न्यायी स्वामीकरिता जे तरवारीच्या धारा सहन करितात तेच शूर असून बाकीचे सर्व डिभयुद्धामध्ये मेलेले होत. अशा शूराकरिताच उत्सुक होऊन देवस्त्रिया महा बलाढ्य वीराच्या आम्ही दयिता (स्त्रिया) आहोत, असे ह्मणत अंतरिक्षात उभ्या रहातात. असो, वर सागितल्याप्रमाणे ते अंतरिक्ष अनेक प्रकारच्या भूतसमूहानी भरून गेले होते ३१. सर्ग-३२ त्या दोघीनी युद्धाच्या इच्छेनें सज्ज झालेल्या त्या दोन्ही सेना पाहिल्या, _असे येथे वर्णन करितात श्रीवसिष्ठ-श्रेष्ठ वीराकरिता उत्सुक होउन नाचू लागलेल्या अप्स- राच्या समूहात उभी राहन लीला सरस्वतीसह खालची दोन्ही सैन्ये पाहू लागली. तिच्या पतीने ज्याचे पालन केले आहे अशा त्या प्रदेशात ती दोन्ही सैन्ये जलचराच्या वंगामुळे क्षुब्ध झालेल्या दोन महासमुद्राप्रमाणे ओळीने उभी होती त्यातील सेनापति नानाप्रकारच्या व्यूहाची रचना व शस्त्रास्त्राची व्यवस्था करण्यात तत्पर झाले होते. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, शूरासह दोघे राजे उभे होते. कवचादि चढवून आणि शस्त्रास्त्रे घेऊन युद्धाकरिता सज्ज झालेले तें सर्व सेन्य पेटलेल्या अग्नीप्रमाणे अद्भुत दिसत होते. त्यातील कित्येकानी चकचकित खड्ने कोशातून बाहेर काढिली होती. कित्येक ढाला सावरीत होते कित्येक शूल, भिदिपाल, परशु इत्यादिकास उठवून शत्रूवर पहिला प्रहार करण्याचा प्रसग केव्हा येतो ह्मणून वाट पहात होते. त्या भयकर युद्धाच्या चितेने कित्येकाचे नेत्र स्थिर व उग्र झालेले होते. शत्रूविषयी चित्तात अतिशय क्रोध उद्भवल्यामुळे कित्येकाच्या भुवया वर चढल्या होत्या. झझावाताने जसे वनातील वृक्ष कपायमान होतात त्याप्रमाणे त्या दोन्ही सैन्यातील लोक नानाप्रकारच्या निमित्तानी चचल झाल्यासारिखे दिसत होते. त्यातील श्रीमान् योद्ध्याच्या अगातील सोन्याची चिलखतें उदय पावणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाने चकचकत होती. सैन्याच्या अगदी पुढच्या रागेतील लोक एकमेकाकडे पाहून शस्त्रे उगारून एकमेकास मारण्याच्या खुणा करीत होते. कित्येक योद्धे एकमेकाकडे नेत्र वटारून एकसारिखे पाहू लागल्या- मुळे चित्रासारिखे दिसत होते. सेनापतींनी दोन्ही सैन्यातील लोकास