पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ३१. २३५ भीराम-भगवन् , आपण कशाप्रकारच्या योद्धयास उद्देशून येथे शूर- शब्दाचा उपयोग करीत आहा ? कोणता योद्धा स्वर्गाचे भूषण होत असतो व डिभाहव कशास ह्मणतात ? श्रीवसिष्ठ-शास्त्रोक्त आचाराने युक्त असलेल्या प्रभूकरिता समर्रा- गणामध्ये जो लढता लढता मरतो, किवा विजयी होतो तो शूराच्या उत्तम लोकाम पात्र होतो. पण अशा रीतीने न मरता इतर प्राण्यानी ज्याचे हात, पाय इत्यादि तोडले आहेत व त्यामुळे जो मेला आहे, त्यास डिभा- वहत ह्मणतात. अशा प्रकारे सग्रामात मरण पावलेला क्षत्रिय नर- काचा भागी होतो. (आता हेच अधिक स्पष्ट करितात.) शास्त्राप्रमाणे ज्याचे आचरण नसते अशा पुरुषाकरिता लढून जो पुरुष सग्रामात मरतो तो अक्षय्य नरकास जातो. शास्त्राचार व लोकाचार याप्रमाणे यथाशक्ति आचरण करणारा जो क्षत्रिय, हा स्वधर्म आहे, असे समजून लढतो तोच ग्वरा भक्त व शूर होय. गायींच्या सरक्षणाकरिता, ब्राह्मणाच्या स्वास्थ्या- करिता, सज्जनास मान्य होणान्या मित्राकरिता व शरणागताचे रक्षण करण्याकरिता युद्ध करून जो मरण पावतो तो पुरुष स्वर्गाचे भूपण आहे. ज्याचे परिपालन करणे अगदी अवश्य आहे अशा स्व- देशाचे रक्षण करण्याकरिता जो राजा युद्धास प्रवृत्त झालेला असतो त्याच्या- करिता समरागणी मरणारा योद्धा वीरलोकास जातो. पण प्रजेस उपद्रव देण्यामध्ये जे तत्पर असतात त्या राजाकरिता अथवा राजा नस- लेल्या आपल्या स्वामीकरिता जे युद्धात मरतात ते अधोगतीस जातात. शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे आचरण न करणाऱ्या राजाकरिता किवा दुसऱ्या एकाद्या वन्याकरिता लढाई करीत असताना शत्रूच्या शस्त्रानी अगाचे तुकडे तुकडे होऊन मेलेला क्षत्रीय नि सशय नरकास जातो. वार्मिक धन्याकरिता जे युद्ध करावयाचे तेही वर्मयुद्धच केले पाहिजे. कारण तसे न केल्यास त्यास स्वर्गलोकात थारा मिळत नाही. कारण अधर्मयुद्धाने मरणारालाही जर स्वर्ग मिळू लागला तर सर्वच सशस्त्र लोक परलोकाविषयी निर्भय होऊन जगात अनर्थ करून सोडतील. यास्तव समरागणात सन्मुख मरणारास पदोपदी स्वर्ग मिळतो, असें जें धर्मशास्त्रात मटलेले आहे त्याचा अर्थ-धर्मयोद्ध्यासच स्वर्ग मिळतो; अधर्मयुद्धाने सन्मुख मरणारासही तो मिळत नाहीं;-असा समजावा. कारण न्यायान्याय,