Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ३१. २६३ या परमाकाशांत ही अनत ब्रह्माडें एकमेकांस न दिसतां आपापला व्यवहार करीत राहतात ३०. सर्ग-३१. अत पुरदर्शन, दुसरे ब्रह्माडदर्शन शूराच्या चिह्नानी सज्ज झालेल्या सैन्याचे दर्शन व धर्माधर्म युद्ध याचे वर्णन या सर्गात करितात श्रीवसिष्ठ-याप्रमाणे आपल्या पूर्व जन्मींच्या जगातून निवून वरच्या सर्गात वर्णन केल्याप्रमाणे अनेक ब्रह्माडाची विचित्रता पहात त्या दोघी त्यातील एका ब्रह्माडात झटकर प्रविष्ट झाल्या व तेथील अत.पुरास पाहून तेथूनही झटकन बाहेर आल्या. त्या अतःपुरात राजाचे शव तसेच पुष्पाच्या राशीत होते. त्या शवाच्या जवळच समाधि लावून बसलेले लीलेचे शरीर होते. शोकामुळे दीर्घ झालेल्या त्या रात्री तेथील सर्व लोक निद्रा घेत होते व तें अत पुर पूर्वीप्रमाणेच धूप, चदन, कापूर इत्यादिकाच्या सुवासाने भरून गेले होते. त्या सर्गास पाहून आपल्या पतीच्या पुढच्या नव्या सर्गास पहाण्याच्या इन्छेने लीला सकल्प देहाने न्या अत.पुरातील मडपाकाशात उडून गेली व त्या ससाराचे आवरण आणि ब्रह्माडाचे सपुट याचे उल्लघन करून किंचित् विस्तृत अशा पतीच्या सकल्प-ससारांत शिरली. ती देवी- मह पुनरपि मोठ्या वेगाने आवरणयुक्त व विस्तृत अशा ब्रह्माडमंडपात शिरून भांचे सकल्प-जग पाहती झाली. साराश पिकलेल्या फळात ज्याप्रमाणे दोन मुग्या प्रवेश करितात त्याप्रमाणे आकारूपी देवी त्या आकाशरूपी ब्रह्माडात शिरून आकाशरूपी जग पहात्या झाल्या. त्यातील निरनिराळे लोक, पर्वत व अतरिक्ष, याचे उल्लघन करून त्या दोघी पर्वत. नद्या, समुद्र, वृक्ष इत्यादिकानीं मडित व मेरूच्या योगाने अलकृत झालेल्या नवद्वीपयुक्त जबू-द्वीपास येऊन पोचल्या. त्यातील भारतवर्षामध्ये जाऊन लीला आपल्या पतीचे राज्य पहाती झाली. पण इतक्यात त्यातील एक मत्त (सिधू देशाचा) राजा, आपल्या सर्व माडलिकासह, तिच्या पतीच्या राज्यांत घुसून आपल्या सैन्याकडून त्याचा देश उद्धवस्त करून टाकू लागला. तेव्हा लीलेच्या पतीलाही शस्त्र उचलणे भाग पडले. त्याच्याशी या राजाचा संग्राम सुरू झाला असता तो पहाण्या करिता आलेल्या त्रैलो- क्यातील प्राण्यानी आकाश गच्च भरून गेले होते. पण हे सर्व मिथ्या.