पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ बृहद्योगवासिष्ठसार. भसें ठरतें, जो त्याचा उत्पादक असेल तोच त्या कल्पाचा मुख्य असणार हे निर्विवाद आहे. विष्णु सत्त्वगुणी, ब्रह्मा रजोगुणी व शिव तमोगुणी आहे. ह्मणजे ते ते गुण त्याच्यामध्ये प्रधान आहेत. त्यामुळे त्यानी रचलेल्या सृष्टींत सारखेपणा असणे शक्य नाही. अर्थात् कल्पाच्या भारंभी जी देवता हिरण्यगर्भ झाली असेल, तिच्या स्वभावाप्रमाणे आद्य सृष्टि निर्माण होऊन त्या कल्पभर, प्रत्येक प्रलयाच्या शेवटी, नशाच प्रकारची सृष्टि होत रहाते. पण प्रत्येक कल्पाच्या आरभी हिरण्यगर्भा- च्या स्वभावाप्रमाणे होणारी सृष्टि भिन्न भिन्न प्रकारची असणेच अगदी सभवनीय व युक्त आहे. यास्तव त्यातील काही ब्रह्माडात विष्णु अधिपति होता. काहीत चतुर्मुख ब्रह्मा मुख्य होता. कित्येकाचा स्वामी रुद्र होता व त्याचप्रमाणे भैरव, दुर्गा, विनायक, इत्यादि भिन्न भिन्न देवता भिन्न भिन्न ब्रह्माडाचे नियमन करीत होत्या. काही ब्रह्माडे तर नियामकरहित होती. कित्येकात तिर्यक् प्राण्याचेच प्राबल्य होते. साराश प्राण्याच्या विचित्र कर्मवासनाप्रमाणे स्रष्टयासही विचित्र इच्छा होऊन विचित्र ब्रह्माडाचा उद्भव होणे अगदी साहजिक आहे. अशा विचित्र अनत सृष्टींनी, अनत प्राण्यानी, अनत व्यवहारानी व सर्व प्रकारच्या अनततेने भरलेले हे महाप्रकाश चैतन्य इतके विस्तृत होऊन राहिले आहे की, विष्णु, शिव इत्यादि महाशक्तिमान् देव आपल्या जन्मभर जरी वावत गहिले तरी त्यास त्याचा अत लागणे शक्य नाही. भूमीमध्ये स्वाभाविक- पणच इतर भूतास आकर्षण करून घेण्याची शक्ति आहे, असे वर सा- गितलेच आहे त्या शक्तीमुळे पृथ्वीच्या सभोवार असलेली जल, तेज, इत्यादि आवरणे पृथ्वीस सोडून दूर जात नाहीत. रामा, आता आणखीं या मायिक जगाचे वर्णन मी किती करू ? अथवा ते कितीही केले ह्मणून काय होणार ' बाबारे, आमची बुद्धि या विषयात याच्यापुढे जाऊ शकत नाही. पण आलास सृष्टीचे याहून अधिक वर्णन करिता येत नाही ह्मणून ती एवढीच आहे, असे समजू नकोस. आझास किवा दुसऱ्याही सर्व आत्मनिष्ठास माहीत नाही अशी आणखी कितीतरी सृष्टि असण्याचा सभव आहे. कारण मायेच्या ठायी असलेली सर्ग- शक्ति अनत आहे. यास्तव भयकर अधकाराने भरलेल्या महा-अरण्यात जसे मदोन्मत्त यक्ष एकमेकास न दिसतांच नाचत असतात त्याप्रमाणे