पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ३०. उपपत्ति लागत नाही. त्याप्रमाणेच काही ब्रह्मांडे जरी शून्यरूप (अव्याकृत, अव्यक्त ) असली तरी ती आहेत असाच तर्क होतो. असो; कित्येक ब्रह्माडामध्ये कल्पात होण्याचा प्रसग आलेला असून तेथे भयकर घर्षर बनि प्रवृत्त झाला आहे. पण स्वभावतःच विषयरसात दग झालेल्या दुसऱ्या दुर्भाग्यास तो ऐकू येत नाही व त्याना त्याचे भानही नाही. दसऱ्या कित्येक ब्रह्माडास नुक्ता आरभ झाला आहे. त्यामुळे ज्यांतील भुवने अगदी प्रारंभी उत्पन्न झालेल्या प्राण्यानीं दूषित झालेली नाहीत अशा त्या अति शुद्ध भुवनात भूमीत बी पेरून त्यावर पाणी शिपले असता जशी अकुरकला उद्भवते तशी सृष्टि उत्पन्न होऊ लागली आहे. कित्येक ब्रह्माडात महाप्रलय होण्याच्या वेळी सर्व भुवनास जाळून स्वतः सूर्यही स्वकारणात शात होत होता. कित्येक ब्रह्माडास स्थिर होण्यास कोठे आधारच मिळेना, त्यामुळे आपल्या पूर्व सवित्-प्रमाणे ती सर्व कल्पभर पतन पावत राहिली होती कित्येक ब्रह्माडें स्थिर होती व कित्येक आपल्या पूर्व ज्ञानाप्रमाणे स्पदरूप होती. श्रीराम-पण गुरुवर्य, धात्याने पूर्वीप्रमाणे या सर्व सृष्टीची पुनरपि रचना केली, असे वेदवचन आहे. तेव्हा त्याच्या विरुद्ध आपण मला हे जगाचे वैचित्र्य कसे सागता? श्रीवसिष्ठ ते वेदवचन पूर्वकल्पी जशी धात्याची सृष्टि होती तशाच पुढच्या सर्व सृष्टि झाल्या, असे सागत आहे. पूर्वजन्मीं केलेल्या वेदशास्त्रोक्त आचारामुळे धातृभावास प्राप्त झालेल्या प्रजापतीने, पहिल्याच सर्गामध्ये, इतर प्रजापतींच्या सर्गाहून वेगळी सृष्टि जशी निर्माण केली होती तशीच ती पुढेही कल्प समाप्त होई तो होत राहिली. कल्पाच्या आरभी जसें सृष्टीचें स्वरूप असते तसेच ते तो कल्प सपेपर्यत रहाते. मध्ये कितीही जरी उत्पत्ती व प्रलय झाले तरी ते बदलत नाही, असा याचा भावार्थ आहे. अर्थात् एका धात्याच्या सृष्टीप्रमाणेच दुसऱ्या धात्याने सृष्टि रचली पाहिजे, असा नियम नाही. त्यामुळे प्रत्येक प्रजापतीच्या सृष्टीत वैचित्र्य असल्यास त्यात काही विरोध, हानि किंवा दोष नाही. शिवाय " तपश्चर्येच्या योगाने पित्या परमेश्वरास सतुष्ट करून एकमेकास जिंकण्याची इच्छा करणारे ते एकमेकापासून उत्पन्न होतात." असे पुराणात सांगितले आहे. त्यावरून ब्रह्मा, विष्णु व महेश हे कल्पभेदार्ने एकमेकांपासून उत्पन्न होतात;