पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० बृहद्योगवासिष्ठसार आहे. कारण ते आपल्या प्रथात असा दृष्टात देत असतात-अतराळी धरलेल्या मातीच्या वर्तुळ गोळ्यावरून मुगी फिरू लागली असता ती खाली, वर, पूर्वेस, पश्चिमेस इत्यादि कोणत्याहि दिशेत जरी गेली व तिचे शरीर खाली, वर कसेंही जरी झाले तरी तिचे पाय लागतात तो अधोभाग व पाठ हा ऊर्ध्व भाग होय. याच न्यायाने सूर्यादि हा ऊर्ध्व व पृथ्वी हा अधोभाग आहे. (आता प्रस्तुत ब्रह्माडाचे वैचित्र्य दाख- विण्याकरिता त्याचे वर्णन करितात.) असो; काही ब्रह्माडातील भूतले वृक्ष व वारुळे यानी वेष्टित असतात. त्यात मनुष्ये नसतात व ती अतरिक्ष देव, किन्नर, दैत्य यानी भरलेली असतात. काही ब्रह्माडे तात्कालिक मकल्परूप चतुर्विध प्राणिसमूहासहवर्तमानच पिकलेल्या अक्रोडाप्रमाणे उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे विध्यपर्वतावरील अरण्यात गज असतात त्याप्रमाणे या पर ब्रह्मामध्ये ब्रह्माडत्रसरेणू आहेत. श्रीराम-जशी ही ब्रह्माडे चिदाकाशाच्या अपेक्षेने त्रमरेणु तसेच ते चिदाकाशही दुसऱ्या एकाद्या वस्तूच्या अपेक्षेने सूक्ष्म आहे की काय ? श्रीवसिष्ठ--नाही. त्याच्याहून अधिक काही नाही. कारण स्थिति- समयी हे सर्व त्याच्याठायी असते, उत्पत्तिसमयीं हे सर्व त्याच्यापासून उत्पन्न होते व प्रलयकाली हे सर्व तद्रूप होते. यास्तव सर्व दिशामध्ये, सर्वकाली व सर्व वस्तूमध्ये तेच परम तत्त्व आहे. तेच हा सर्वमय आत्मा आहे. तेव्हा ते दुसऱ्या कोणाच्या अपेक्षेने सूक्ष्म असणार ? त्या शुद्ध बोधमय परम प्रकाशरूप सागरामध्ये हे ब्रह्माडसज्ञक तरग एकसारिखे येऊन नाहीसे होत असतात. त्यातील काही ब्रह्माडें अतःशून्य होऊन राहिली आहेत. ह्मणजे ती अव्याकृत आहेत. अर्थात् पूर्व कल्पातील सर्व सकल्पीजभूत लिगोपाधींचा क्षय झाला असता तमोरूप होऊन राहिली आहेत. निजलेल्या प्राण्याप्रमाणे त्याची स्थिति आहे. (“ पूर्वी असत् असून त्याच्यापासून सत् झाले" असे जे यजुर्वेदाच्या उपनिषदाचे वचन आहे त्यातील असत्-शब्दाप्रमाणेच शून्यता-शब्दानेही अव्याकृताचाच निर्देश करितात.) पण त्या शून्यसागरात, प्रसिद्ध सागरातील तरगाप्रमाणे, ती आहेत, अशी कल्पना होते. कारण व्यावहारिक समुद्राच्या पाण्यावर एकादे वेळी तरग जरी न दिसले तरी त्या पाण्यात ते बीजरूपाने आहेत अशीच कल्पना करावी लागते व ती न केल्यास तरगांच्या उत्पत्तीची